Lumpy Virus : वाशीम जिल्ह्यात ७ जनावरे दगावली

Lumpy Skin Disease : वाशिम जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असून, आतापर्यंत ७जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. नावरांच्या लसीकरणावर भर दिला जात असून, आठवडाभरात १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल, असा दावाही विभागातर्फे करण्यात आला आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon
Published on
Updated on

Washim News : वाशीम जिल्ह्यात वेगाने लसीकरण सुरू आहे. मात्र तरीही ७ जनावरे दगावल्याने पशुपालकांमध्ये खळबळ उडालेली आहे. दुसरीकडे पशुसंवर्धन विभागाने प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin : सातारा जिल्ह्यातील जनावरांच्या बाजारावर बंदी

वाशीम जिल्ह्यात एकूण एक लाख ६८ हजार ९१ गोवर्गीय पशुधन आहे. आजपर्यंत एक लाख ५९ हजार ४०४ जनावरांचे लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, तरी देखील वाशीम तालुक्यात चार, मालेगाव तालुक्यात एक, मंगरुळपीर तालुक्यात एक व रिसोड तालुक्यात एक अशी एकूण सात गोवंशीय जनावरे लम्पी स्कीनमुळे दगावली आहेत.

Lumpy Skin
Lumpy Vaccination : खानदेशात जनावरांचे लसीकरण एक लाखांवर

पशुसंवर्धन विभाग सतर्क

लम्पी स्कीनचा वाढता प्रादुर्भाव पाहता पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. लसीकरणाचे काम केले जात आहे. सोबतच प्रतिबंध रोखण्यासाठी उपाययोजनाही सुचविल्या आहेत. जनावरांना या आजाराची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी त्वरित संपर्क साधण्याचे म्हटले आहे.

बाधित जनावरे कळपातील निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावे. त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था देखील वेगळी करावी. बाधित जनावरांची वाहतूक करू नये. बाधित जनावरांवर वेळीच औषधोपचार करण्यात यावे.

बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नये. मृत जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. या रोगाचा प्रसार हा मुख्यत्त्वे बाह्य कीटकाद्वारे होत असल्याने जनावरांचे गोठे व त्यालगतचा परिसर येथील मच्छर, गोचीडमुक्त ठेवावा.

माश्यांचे निर्मुलन करण्यासाठी जंतनाशक औषधांची फवारणी करून घ्यावी व जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय गोरे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरुण यादगिरे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com