Grampanchayat Building : नांदेडमधील ६६ ग्रामपंचायतींना मिळणार नवीन इमारती

Grampanchayat Fund : मागील अनेक वर्षांपासून इमारती नसलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निधी मिळावा, म्हणून मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींना नवीन इमारत बांधण्यासाठी निधी मिळणार आहे.
Grampanchayat
GrampanchayatAgrowon

Nanded News : मागील अनेक वर्षांपासून इमारती नसलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निधी मिळावा, म्हणून मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींना नवीन इमारत बांधण्यासाठी निधी मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री बांधणी योजनेतून १४ कोटी ९५ लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या वतीने संबंधित ग्रामपंचायतीच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायतींची संख्या एक हजार ३१० आहे. त्यातील २६४ ग्रामपंचायतींना इमारती नाहीत. ग्रामपंचायतीला इमारती उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने मागील अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते.

Grampanchayat
Grampanchayat Bhavan : सहा वर्षांनंतर मिळाली प्रशासकीय मान्यता

राज्य शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री बांधणी योजनेच्या माध्यमातून इमारती नसलेल्या जिल्‍ह्यातील ६६ ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी १४ कोटी ९५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय ग्रामपंचायतीने इतर योजनेतून दोन कोटी ५५ लाख रुपये भरण्याच्या सूचनाही करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

या आहेत ६६ ग्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी याबाबत एक आदेश काढत कंधार तालुक्यातील बिजेवाडी, गांधीनगर, गुट्टेवाडी, मादाळी, रूई, किनवट तालुक्यातील कोल्हारी, देगलूर तालुक्यातील भायेगाव, रमतापूर, दरेगाव, टाकळी (ज), गवंडगाव, लोणी, नांदेड तालुक्यातील बोरगाव (त), वांगी, सुगाव बुद्रुक, सायाळ, निळा, रहाटी बुद्रुक, काकांडी, इंजेगाव,

Grampanchayat
Grampanchayat Scam : बनावट दस्त बनविणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यावर कारवाई

बोंढार हवेली, मार्कंड, भोकर तालुक्यातील कामनगाव, धावरी बुद्रुक, माहूर तालुक्यातील पवनाला, रूई, शेकापूर, सायफळ, मांडवा, सतीगुडा, मच्छिंद्र पार्डी, मुखेड तालुक्यातील उमरदरी, हिरानगर, खैरका, राजुरा बुद्रुक तांडा, चिवळी, कमळेवाडी, फुटकळवाडी, कोटग्याळ, मुदखेड तालुक्यातील डोणगाव, राजवाडी, लोहा तालुक्यातील बोरगाव, लोंढे सांगवी, देऊळगाव, सायाळ, बोरगाव (आ), कलंबर बुद्रुक,

हदगाव तालुक्यातील कोळगाव, उमरी खुर्द, पिंपरखेड, चाभरा तांडा, मनुला बुद्रुक, निमगाव, कोळी, लिंगापूर, हिमायतनगर तालुक्यातील कार्ला पी, कांडली खुर्द, वडफळी, बळीराम तांडा, अर्धापूर तालुक्यातील दिग्रस नांदली, जांभरूण, पांगरी, खैरगाव बुद्रुक, आमराबाद तांडा, बिलोली तालुक्यातील कौठा अशा ६६ ग्रामपंचायतींना नवीन इमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com