Fertilizer Stock : रत्नागिरी जिल्ह्यासाठी ६,३०० टन खत उपलब्ध

Kharif Season Update : खरीप हंगामात जिल्ह्यात शेतकऱ्यांना वेळेत खतपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग प्रयत्न करत आहे. जिल्ह्याला सुमारे १२ हजार टन मंजूर खतसाठ्यापैकी ६ हजार ३०० टन खत शासनाकडून उपलब्ध झाले आहे.
Fertilizer Selling
Fertilizer SellingAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri Fertilizer Update : खरीप हंगामात जिल्ह्यात शेतकऱ्यांना वेळेत खतपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग प्रयत्न करत आहे. जिल्ह्याला सुमारे १२ हजार टन मंजूर खतसाठ्यापैकी ६ हजार ३०० टन खत शासनाकडून उपलब्ध झाले आहे. ते जिल्ह्यातील विकास सहकारी सोसायटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील एकूण खरीप पिकाखालील क्षेत्र सुमारे ८१ हजार ९९५ हेक्टर आहे. खरीप भातपिकाखालील क्षेत्र सुमारे ६८ हजार हेक्टर, नागली क्षेत्र सुमारे १० हजार २३६ हेक्टर एवढे आहे.

यावर्षी २०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी २१ हजार टन खताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे १२ हजार ७४० टन खत मंजूर झाले आहे. खरीप काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत खतपुरवठा होण्यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

अजूनही पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शेतीची कामे रखडली. तरीही भविष्यात खताची अडचण होऊ नये यासाठी शेतकरी खत विकत घेत आहे.

Fertilizer Selling
Organic Fertilizer : रासायनिकऐवजी शेणखताकडे कल

आतापर्यंत रेल्वेच्या टप्प्याटप्प्याने खत दाखल झाले आहेत. मंजूर खताच्या तुलनेत ४० टक्के खत प्राप्त झाले. हे खत प्रत्येक सोसायटीला समान वाटप करण्यात आले.

तरीही अजून शेतकऱ्यांना खत पुरवठा झालेला नाही. जून महिन्यात येणारा अपेक्षित साठा जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. येत्या चार दिवसांत अजून एक मोठी खताची रेक दाखल होणार आहे. त्यामधून सुमारे दीड हजार टन खत मिळेल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून विक्री होणाऱ्या बियाणे, खते, कीटकनाशकांचा दर्जा, भेसळ यांची तपासणी केली जाते. निविष्ठांची अनधिकृत साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका कार्यक्षेत्रात भरारी पथकांची स्थापना केली गेली आहे. तसेच जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत आहे.
अजय शेंडे, कृषी विकास अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com