Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon

Sugarcane Crushing : सांगली जिल्ह्यात ६३ लाख टन उसाचे गाळप

गेल्या साडे तीन महिन्यांत सांगली जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी ५३ लाख ९४ हजार टन उसाचे गाळप करीत ७१ लाख २५ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.
Published on

Sugarcane Season Sangli : जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी (Sugar Factory) ६३ लाख ९४ हजार ९७० टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) करून ७१ लाख २५ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

सरासरी साखर उतारा (Sugar Recovery) ११ टक्क्यांपर्यंत आहे. जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांपैकी नऊ कारखान्यांनी एकरकमी ‘एफआरपी’ (FRP) दिली असून ४ साखर कारखान्यांनी एकरकमी ‘एफआरपी’ देण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात १ लाख ३४ हजार हेक्टर इतके उसाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे अठरा साखर कारखाने आहेत. त्यापैकी १३ साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामातील गाळप सुरू केले आहे.

गेल्या साडे तीन महिन्यांत सांगली जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी ५३ लाख ९४ हजार टन उसाचे गाळप करीत ७१ लाख २५ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. राजारामबापू कारंदवाडी, राजारामबापू युनिट दोन या साखर कारखान्यांचा साखर उतारा अधिक आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane FRP : ‘एफआरपी’पोटी ४ हजार ६३० कोटी अदा

एका बाजूला हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी ‘एफआरपी’ देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याची भूमिका घेतली. संघटना रस्त्यावर उतरली.

त्यामुळे जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांनी एकरकमी ‘एफआरपी’ (Sugarcane FRP) शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे; मात्र, चार साखर कारखान्यांनी पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला असला तरी, एकरकमी ‘एफआरपी’चे तुकडे केले.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस कारखानदारांनी मागे ठेवला आहे. त्यामुळे ऊसतोड वेळेत न मिळणे, उसाला तुरे येणे यामुळे वजनात घट येत आहे.

ऊसतोड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आटापिटा करावा लागत आहे. कारखान्याचे कर्मचारी आणि ऊस तोडणी मजुरांची शेतकऱ्यांना अक्षरशः मनधरणी करावी लागत असल्याचे चित्र आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane FRP : ‘एफआरपी’ १४ दिवसांत देण्याची तरतूद कायम असल्याचा निर्वाळा

शेतकऱ्यांची होतेय लूट

आधीच ऊस वेळेत साखर कारखान्यात जात नसल्याने आणि त्याला तुरे आल्याने वजनात घट येत आहे. त्यातच मजुरांकडून शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीसाठी जादा पैशांची मागणी करून अडवणूक सुरू झाली आहे.

सर्वच बाजूंनी लूट सुरू असल्याने, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com