Pink E -Rikshaw : पिंक ई रिक्षा योजनेचा सोलापूरच्या ६०० महिलांना मिळणार लाभ

Women empowerment in Solapur : योजनेच्या सुधारित शासन निर्णयानुसार ही योजना फक्त सोलापूर शहरासाठी मर्यादित न ठेवता ही योजना सोलापूर जिल्ह्यातील तालुकास्तरावरील सर्व मोठ्या शहरासाठी लागू केली आहे.
Pink E-Rikshaw
Pink E-RikshawAgrowon
Published on
Updated on

Solapur News : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच, महिला व मुली यांचा सुरक्षित प्रवास होणे यासाठी ‘‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’’ ही योजना सुरु केली आहे.

योजनेच्या सुधारित शासन निर्णयानुसार ही योजना फक्त सोलापूर शहरासाठी मर्यादित न ठेवता ही योजना सोलापूर जिल्ह्यातील तालुकास्तरावरील सर्व मोठ्या शहरासाठी लागू केली आहे. तसेच जिल्ह्यासाठी निश्चित केलेली लाभार्थी संख्या २०० ऐवजी ६०० केलेली आहे.

Pink E-Rikshaw
Women Empowerment : बचत गटाच्या साथीने महिला झाल्या सक्षम

या योजनेनुसार ७० टक्के कर्ज बैंकेमार्फत उपलब्ध करुन दिले जाणार असून, राज्य शासन २० आर्थिक भार उचलणार आहे व १० टक्के रक्कम लाभार्थी यांना भरावयाची आहे. पिंक ई-रिक्षा हा महिलांनीच चालवायची आहे,

ॲग्रो विशेष

Pink E-Rikshaw
Women Empowerment : बांबूच्या वस्तू निर्मितीतून आदिवासी महिला झाल्या कुशल

तरी इच्छुक पात्र महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सी. एस. नं. १६०८-१६०९, प्लॉट नं. १२ पहिला मजला, शोभा नगर, सात रस्ता, बिग बझार च्या पाठीमागे, सोलापूर येथे अर्जाचा नमुना व अधिक माहिती साठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले आहे.

योजनेसाठी पात्रता खालील प्रमाणे...

लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे

अर्जदार महिलेचे वय २०-४० वर्षे दरम्यान असावे.

अर्जदार महिलेचे बँक खाते असावे.

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा जास्त नसावे, आदी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com