Jalna Zilha Bank : जालना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ५९ अर्ज वैध

District Bank Update : जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक कार्यक्रमाने आता गती पकडली आहे.
Jalna Zilha Bank
Jalna Zilha BankAgrowon
Published on
Updated on

Jalna Bank Election News : जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक कार्यक्रमाने आता गती पकडली आहे. सोमवारी (ता. २६) झालेल्या छाननी प्रक्रियेत प्राप्त ७५ अर्जांपैकी १६ अर्ज अवैध ठरले असून, ५९ अर्ज वैध ठरले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याला ही बँक आपल्या ताब्यात असावी, असे वाटते.

Jalna Zilha Bank
Jalna Market Committee Election : जालना बाजार समिती निवडणुकीतून ३०८ जणांची माघार

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर गेल्या वेळी केवळ दोन जागांसाठी निवडणूक झाली होती १५ जागा बिनविरोध झाल्या होत्या. बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवली होती. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पुन्हा निवडणूक होते आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे. एकूण ६९८ मतदार मतदान करणार आहेत. २३ जून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ७५ अर्ज दाखल झाले होते. २६ जून रोजी अर्ज छाननी झाली. त्यापैकी १६ अर्ज अवैध, तर ५९ वैध ठरले आहेत. ११ जुलै अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तारीख आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना १२ जुलै रोजी चिन्ह वाटप केले जाणार आहे. २३ जुलै रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर २४ जुलै रोजी मतमोजणी व त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल, असा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर आहे.

छाननीअंती माजी मंत्री अर्जुन खोतकर, सतीश टोपे, राहुल लोणीकर, आमदार संतोष दानवे, कैलास गोरंट्याल आदी प्रमुख व्यक्तींचे अर्ज वैध ठरले आहेत. तर सुरेशकुमार जेथलिया यांच्यासह १६ जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

अर्थात छाननी निकालापासून तीन दिवसांत याविषयी अवैध अर्ज ठरलेल्यांना अपील दाखल करण्याची संधी असणार आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे काही जागा बिनविरोध तर काही जागांसाठी निवडणूक होणार हे ११ जुलैनंतर स्पष्ट होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com