Nagpur News: नागपुरात मदर डेअरीचा साडेपाचशे कोटींचा प्रकल्प उभा होत आहे. याअंतर्गत विदर्भ-मराठवाड्यातील दूध गोळा करून आईस्क्रीम, पनीर चीज, संत्राबर्फी आदी उत्पादने तयार होतील. त्याला मध्य व दक्षिण भारतात बाजारपेठही उपलब्ध होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला..धारणी येथील २ हजार लिटर क्षमतेच्या बल्क मिल्क कुलरच्या उद्घाटन सोहळा आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला..Mother Dairy : मदर डेअरीकडून दूध विक्री दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ.यावेळी एनडीडीबीचे चेअरमन डॉ. मिनेश शहा, व्यवस्थापकीय संचालक सी. पी. देवानंद, मराठवऱ्हाड मिल्क प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्ष वर्षा चव्हाण, लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राच्या प्रमुख निरुपमा देशपांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवी कोल्हे यांची उपस्थिती होती..Mother Dairy in Mumbai : मुंबईतील मदर डेअरीची जागा अदानींच्या घशात घालण्याचा घाट; काँग्रेसकडून गंभीर आरोप.मेळघाटमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात गडकरी यांनी आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांची पूर्तता केल्याचे समाधान असल्याची भावनाही गडकरी यांनी व्यक्त केली. २ हजार लिटर क्षमतेच्या बल्क मिल्क कुलरचीन् उपलब्ध होणे, ही मेळघाटमधील परिवर्तनाची नांदी आहे..यातून स्थानिक दूध उत्पादनाला नवसंजीवनी मिळेल. रोजगार निर्मिती होईल, आरोग्य व्यवस्था सुधारेल, असे ते म्हणाले. मदर डेअरीचा हा पुढाकार मेळघाटच्या विकासासाठी आवश्यक होता, असेही ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.