Vitthal Sugar Factory : ‘विठ्ठल’च्या ५५ माजी संचालकांना नोटीस

Sugar Factory : गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाचा कारनामा समोर आला आहे.
Niphad Cooperative Sugar Factory
Niphad Cooperative Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on


Pandharpur News : पंढरपूर ः गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाचा कारनामा समोर आला आहे. जवळपास ५५ माजी संचालकांसह १५ अधिकाऱ्यांना साखर विभागाच्या विशेष लेखा परीक्षकाने कायदेशीर कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली आहे.

विठ्ठल साखर कारखान्यातून २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षात तब्बल १० कोटी ४५ लाख २६ हजार रुपयांचे नियमबाह्य अॅडव्हॉन्स स्वरूपात वाटप केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तत्कालीन संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांनी ऊस तोडणी, वाहतूक ठेकेदार आणि काही शेतकऱ्यांना नियमबाह्य पैसे वाटप करून कारखान्याचे आर्थिक नुकसान केले आहे. कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये, अशी नोटीस संबंधितांना दिली आहे.  

Niphad Cooperative Sugar Factory
Jagtap Cooperative Sugar Factory : विधानसभा निवडणूक तोंडावर माजी आमदार जगताप आणि आमदार राजळे यांच्या साखर कारखानदारीला धक्का

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अंतर्गत असलेल्या श्री विठ्ठल सर्व सेवा संघाच्या माध्यमातून हे नियमबाह्य वाटप करण्यात आल्याचे लेखा परीक्षण अहवालात दिसून आल्याचे  या नोटीस मध्ये विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांनी नमूद केले आहे. कारखाना पोटनियमात तरतूद नसताना आणि निबंधकांची मान्यता न घेता तत्कालीन संचालक मंडळाने नियमबाह्य रक्कमा वाटप केल्याचे लेखा परीक्षण अहवालामध्ये समोर आले होते.

त्यानंतर विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी २०१५-१६ आणि २०१६-१७ आर्थिक वर्षातील चौकशी अहवाल तत्कालीन प्रादेशिक सहसंचालकांकडे सादर केला होता. त्या अहवालामध्ये ही नियमबाह्य अॅडव्हान्स वाटप करण्यात आल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे. कारखान्याची  थकीत रक्कम वसूल करण्यासंदर्भात संचालक मंडळाला सूचित केले होते. त्यानंतरही कारखान्याची रक्कम वसूल झाली नसल्याने अखेर साखर विभागाचे विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांनी माजी संचालकांसह तत्कालीन अधिकाऱ्यांना  नोटीस दिली आहे. पंधरा दिवसामध्ये समाधानकारक खुलासा करावा, अन्यथा सहकार कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असेही या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

आमचे संचालक मंडळ सत्तेवर येण्यापूर्वीच्या संचालक मंडळाने ट्रॅक्टर मालक, ऊस तोडणी मुकादम आणि मंगळवेढा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अॅडव्हान्स स्वरूपात १० कोटी ४५ लाख रुपये दिल्याची तक्रार एका सभासदानेच केली होती. त्याची चौकशी झाली. त्यामध्ये तत्कालीन संचालक मंडळ दोषी आढळून आले आहे. त्यानंतर वसुलीची कारवाई सुरु झाली आहे.  
-आमदार अभिजित पाटील, चेअरमन, विठ्ठल सहकारी साखर कारखाना

विठ्ठल साखर कारखान्याच्या संचालक मंडळात तज्ञ संचालक म्हणून मी काम केले आहे. विशेष लेखा परीक्षक गौतम निकाळजे यांनी कारखान्याच्या १० कोटी ४५ लाख रुपयांच्या नियमबाह्य अॅडव्हाऩ्स वाटप संदर्भात मलाही नोटीस दिली आहे. पंधरा दिवसात लेखी खुलासा द्यावा, असे नोटिशीत नमूद केले आहे. मी लेखी म्हणणे सादर करणार आहे.
- शेखर भोसले, माजी तज्ज्ञ संचालक, विठ्ठल साखर कारखाना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com