Water Shortage
Water Shortage Agrowon

Water Shortage : जालना जिल्ह्यातील ५१४ गावांना पाणीटंचाईचा धोका

जिल्ह्यात गतवर्षी परतीचा पाऊस जोरदार झाला होता. मात्र, हा पाऊस असमतोल झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करण्याचे वेळ येणार आहे.
Published on

उमेश वाघमारे

Jalna News : यंदा जिल्ह्यातील तब्बल ५१४ गावांना व दोन वाड्यांना पाणी टंचाईचे (Water Shortage) चटके बसण्याची शक्यता आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांची तयारी सुरू केली असून, दहा कोटी ९४ लाख ३० हजारांचा पाणीटंचाई निवारण उपाययोजनांचा (Water Scarcity Measures) आराखडा मंजूर केला आहे.

यंदा १६२ गावांना पाणीपुरवठा (Water Supply) करण्यासाठी टॅंकरचा आधार घ्यावा लागणार असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात गतवर्षी परतीचा पाऊस जोरदार झाला होता. मात्र, हा पाऊस असमतोल झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करण्याचे वेळ येणार आहे.

यात प्रामुख्याने एप्रिल ते जून महिन्यादरम्यान जिल्ह्यातील ५१४ गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून विंधन विहीर दुरुस्ती, नळ योजना विशेष दुरुस्ती, तात्पुरती नळ योजना, खासगी विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे अशा कामांच्या आराखड्याला मान्यता दिली आहे.

Water Shortage
Irrigation Projects : अकोला जिल्ह्यात अनेक प्रकल्पांत पाणी असूनही शेतीसाठी उपयोग नाही

त्यासाठी दहा कोटी ९४ लाख ३० हजारांचा खर्च मंजूर केला आहे. यात मार्च महिन्यापर्यंत जिल्ह्यातील १९२ गावे व दोन वाड्यांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी चार कोटी ५० लाख २८ हजारांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान जिल्ह्यातील ५१४ गावे व दोन वाड्यांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी सहा कोटी ४४ लाख दोन हजारांची अशी एकूण दहा कोटी ९२ लाख ३० हजारांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईचे ढग निर्माण झाल्याचे चित्र आहे.

टँकरची येणार वेळ

यंदा एप्रिल महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्‍न बिकट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात टँकर सुरू होण्याची शक्यता आहे.

जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्यात एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील तब्बल १६२ गावे व दोन वाड्यांना १६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे वेळ येण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे.

तर ३५२ गावांमध्ये ३५२ खासगी विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते, असे या टंचाई निवारण आराखड्यात समाविष्ट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com