Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ’मध्ये ५० हजार कोटींचे गौडबंगाल

Raju Shetti : राज्य शासनाने कोणाचीही मागणी नसताना घाट घातलेल्या शक्तिपीठ महामार्गामुळे सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्यांची मोठी लूट होणार आहे.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwayAgrowon
Published on
Updated on

Sangli News : राज्य शासनाने कोणाचीही मागणी नसताना घाट घातलेल्या शक्तिपीठ महामार्गामुळे सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्यांची मोठी लूट होणार आहे. या महामार्गामागे ५० हजार कोटी रुपयांचे गौडबंगाल दडले आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केली. काहीही झाले तरी हा महामार्ग होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

इस्लामपूर येथे रविवारी (ता. १६) आयोजित पत्रकार परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. या वेळी संदीप राजोबा, पोपट मोरे, भागवत जाधव आदी उपस्थित होते. श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘विकासाला विरोध करत असल्याची व नकारात्मक भूमिका घेत असल्याची टीका आमच्यावर होत आहे; मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. शेतकरी व महापूरग्रस्तांना त्याचा फटका बसणार आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : ‘स्वाभिमानी’कडून अर्थसंकल्प, ‘शक्तिपीठ’च्या अधिसूचनेची होळी

तो धोका एका बाजूला असताना नदीवर महामार्गाच्या पुलाचे बांध घालण्याचे काम हाती घेतले जात आहे. अलमट्टीच्या उंचीविरोधात केंद्रीय जल आयोगाकडे लेखी तक्रार दिली आहे. कृष्णा नदीकाठावर पुन्हा नव्याने अंकली-उमळवाड तसेच दानोळी ते सांगलवाडी या नव्याने होणाऱ्या नव्या पुलांमुळे मिरज-वाळवा तालुक्यातील अनेक गावांत त्याची फुग येणार आहे.

शिरोळ तालुक्यात मांजरीच्या पुलाने आलेले अनुभव विचारात घेतले जावेत. वारणा नदीच्याही पाण्याची फुग वाढणार आहे. महामार्ग रेखांकन करताना विचार झाला नाही. आराखडा अंतिम करताना तज्ज्ञांसमवेत विचारविनिमय व्हायला हवा होता, तोही झाला नाही.’’ श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘इतर महामार्ग प्रति किलोमीटर ३५ कोटींत होतात. शक्तिपीठला प्रति किलोमीटर १०७ कोटी रुपये खर्च आहे.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : मंत्री हसन मुश्रीफांचा शक्तिपीठ महामार्गाबाबत 'यु टर्न', ज्यांना जमिनी द्यायच्या त्यांनी द्याव्यात

८०२ किलोमीटरच्या रस्त्याचा प्रकल्प ८६ हजार ३०० कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. विलंब झाल्यानंतर तो दीड लाख कोटींवर जाऊ शकतो. ज्यांच्या मतदार संघातून हा मार्ग जाणार आहे ते लोकप्रतिनिधीही त्यातून त्यांना काहीतरी मिळेल या आशेने शांत आहेत. या महामार्गाच्या मागील अर्थकारणात खरे गौडबंगाल दडले आहे.

रेडीरेकनर दरानुसार आठ ते नऊ लाख रुपये एकरी तर बाजारभावाचा दर ४० लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे या महामार्गात शेतकऱ्यांच्याही हाती काहीही लागणार नाही. त्यामुळे हा रस्ता कोणासाठी? याचा विचार झाला पाहिजे. काहीही झाले तरी आम्ही हा रस्ता होऊन देणार नाही.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com