Kanda Chal : ‘एनएचआरडीएफ'च्या सुधारित कांदाचाळीत सड ५० टक्के कमी

Onion Storage : राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन विकास प्रतिष्ठान ‘एनएचआरडीएफ'च्या तज्ज्ञांनी २५ टन क्षमतेचे सुधारित ‘आंशिक वातावरणीय नियंत्रित कांदा साठवण गृह’ विकसित केले आहे. त्यामध्ये ५० टक्क्यांवर कांदा सड कमी झाल्याचे समोर आले आहे.
Onion Storage
Onion Storage Agrowon
Published on
Updated on

Nashik News : उन्हाळ कांदा साठवणुकपश्चात पारंपरिक पद्धतीने साठवणूक केल्यास सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कांद्याची सड सरासरी २५ ते ३० टक्क्यांवर होते. परिणामी विक्रीवेळी कांदा उपलब्धता व वजन कमी झाल्याने संभाव्य उत्पन्नावर परिणाम होतो.

या समस्येवर पर्याय देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन विकास प्रतिष्ठान ‘एनएचआरडीएफ'च्या तज्ज्ञांनी २५ टन क्षमतेचे सुधारित ‘आंशिक वातावरणीय नियंत्रित कांदा साठवण गृह’ विकसित केले आहे. यासंबंधी साठवणूक निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. त्यामध्ये ५० टक्क्यांवर कांदा सड कमी झाल्याचे समोर आले आहे.

Onion Storage
Nashik Red Onion : नवीन खरीप लाल कांद्याची नाशिकमध्ये आवक सुरू ; मुहूर्ताला २,४३० रुपये दर

वातावरणीय बदल व तापमान वाढ या दोन प्रमुख कारणांनी कांदा सडण्याचे प्रमाण वाढत आहे. ही समस्या विचारात घेऊन २०१७ साली कुंदेवाडी (सिन्नर) येथील ‘एनएचआरडीएफ’च्या प्रक्षेत्रावर संशोधन सुरू झाले. त्यातून २५ टन क्षमतेचे ‘आंशिक वातावरणीय नियंत्रित कांदा साठवण गृह’विकसित झाले.

या प्रकल्पात ‘एनएचआरडीएफ’चे अतिरिक्त संचालक डॉ. पी. के. गुप्ता, डॉ. भास्कर, वरिष्ठ तंत्र अधिकारी तुषार आंबरे, तंत्र सहाय्यक बी. पी. रायते यांचा सहभाग होता. यासंबंधी शोधनिबंध ‘व्हेजिटेबल सायन्स’ या जर्नलमध्ये जुलै-डिसेंबर २०२० मध्ये प्रकाशित झाला. यात सातत्याने सुधारणा करून ते आता नावारूपास आले आहे.

ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Onion Storage
Onion Market: कांदा भावावरील दबाव पुढील काळातही कायम राहील का? | Agrowon| ॲग्रोवन

प्रामुख्याने ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान कांद्याचा पुरवठा बाजारात कमी होत असतो. त्यामुळे या कालावधीत कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री करत शेतकरी साठवणुकीचे नियोजन करत असतात. मात्र वातावरण बदल तसेच तापमानवाढीमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढत्या आहेत.

या समस्येवर ‘एनएचआरडीएफ’च्या टीमने कांदा साठवणूक संबंधी केलेले संशोधन महत्त्वपूर्ण ठरेल. यामध्ये हवा खेळती ठेऊन कांदा साठवणूक गृहाची संरचना तयार केली आहे. ज्यामध्ये तापमान व आर्द्रते शिवाय योग्य वायुविजन उपलब्ध होते. यात साठवणूक काळात तापमान व सापेक्ष आर्द्रता नियंत्रित ठेवण्यासाठी योजना केली आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या फलोत्पादन व पीक विज्ञान विभागाचे उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंह, भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कीर्ती सिंग, तत्कालीन प्रधान कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते यांनी या साठवणूक गृहाची पाहणी केली आहे.

Onion Storage
Onion Cultivation : उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट

शेतकऱ्यांकडून अवलंब; यशस्वी परिणाम

कुंदेवाडी (ता. सिन्नर) येथील प्रक्षेत्रामधील सुधारित साठवणूक गृह पाहून गणोरे (ता. अकोले, जि. नगर) येथील शेतकरी मिलिंद आंबरे व गोरख आंबरे यांनी त्याची उभारणी केली. ऑक्टोबरच्या दुसऱ्या सप्ताहअखेर कांदा चाळींत नुकसान तुलनेत कमी दिसून आले, तर कांदा रंग त्यावरील आवरण व प्रतवारी टिकून राहिली.

ज्या कांद्याची सड झाली ते कांदे जागीच शुष्क झाले. त्यामुळे लगतच्या कांद्यांना सड झालेली नाही. प्रतवारी उच्च दर्जाची असल्याने कांदा बियाणे कंपनीने हा कांदा प्रतिक्विंटल ३ हजार रुपयांनी खरेदी केल्याचे आंबरे यांनी सांगितले. शनिवारी (ता.१४) प्रक्षेत्र दिवस घेण्यात आला. त्यामध्ये नाशिक व नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यासंबंधीचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवले.

कमी खर्चात व कमी जागेत कांदा साठवणूक पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाला आहे. सहा महिने साठवणुकीसाठी वापर केल्यानंतर जागेचा पुनर्वापर शक्य आहे. या मॉडेलची मांडणी शासकीय यंत्रणांकडे केली आहे. अनुदानासाठी विचाराधीन आहे. -
डॉ. पी. के. गुप्ता, अतिरिक्त संचालक, एनएचआरडीएफ, नवी दिल्ली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com