Sugar Factory Election : ‘वैद्यनाथ’साठी शेवटच्या दोन दिवसांत ५० उमेदवारी अर्ज

Vaidyanath Cooperative Sugar Factory Election : गोपीनाथ गड (पांगरी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार (ता. १६) शेवटचा दिवस होता.
Sugar Factory Election
Sugar Factory ElectionAgrowon

Beed Sugar mill News : गोपीनाथ गड (पांगरी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार (ता. १६) शेवटचा दिवस होता.

शेवटच्या दोन दिवसांत २१ जागांसाठी एकूण ५० अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काल झालेल्या छाननीत ३७ अर्ज मंजूर, १३ नामंजूर झाले.

पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे, प्रज्ञा मुंडे, अजय मुंडे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. आमदार धनंजय मुंडे यांनी मात्र उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गोपीनाथ गड (पांगरी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निर्मिती लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी युती सरकारच्या काळात केली होती. यानंतर आजपर्यंत कायम वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे व त्यांच्या पश्‍चात त्यांची कन्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे वर्चस्व राहिलेले आहे.

Sugar Factory Election
Sugar Mills Election : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बहीण-भावाची एकी?

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड निवडणूक अधिकारी समृत जाधव यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांसाठी निवडणूक घोषित केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले.

मुंडे कुटुंबातील पाच उमेदवारी अर्ज आहेत. यात पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे, प्रज्ञा मुंडे, अजय मुंडे यांच्यासह फुलचंद कराड आदींची उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी (ता. १७) होत असून, अर्ज मागे घेणे १८ मे ते १ जून, मतदान ११ जूनला व १२ जूनला मतमोजणी होणार आहे. वैद्यनाथ कारखान्याची निवडणूक घोषित झाल्याने मुंडे-बंधू भगिनी पुन्हा निवडणुकीच्या माध्यमातून समोरासमोर येणार असे वाटत होते.

मात्र आमदार धनंजय मुंडे यांनी कारखान्याच्या निवडणुकीत स्वतः किंवा परिवारातील कोणाचा अर्ज दाखल केला नाही. फक्त एकमेव अजय मुंडे यांचा त्यांच्या गटातून परिवारातील उमेदवारी अर्ज आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com