Bamboo Cultivation : पालघरमध्ये ५० लाख बांबू वृक्ष लागवडीचा प्रारंभ

Bamboo Farming : ‘दुर्गम पालघर जिल्ह्यातील ५० लाख बांबू वृक्ष लागवडीचा संकल्प धानिवरी आदिवासी पाड्यावर प्रत्यक्ष बांबू लागवडीचा प्रारंभ करून झाला.
Bamboo Farming
Bamboo FarmingAgrowon
Published on
Updated on

Palghar News : ‘दुर्गम पालघर जिल्ह्यातील ५० लाख बांबू वृक्ष लागवडीचा संकल्प धानिवरी आदिवासी पाड्यावर प्रत्यक्ष बांबू लागवडीचा प्रारंभ करून झाला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाने मिशन कुटुंब आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी हरित महाराष्ट्रअंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे पण सहकार व वस्त्रोद्योग सचिव प्रवीण दराडे, मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल, पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, उपजिल्हाधिकारी (मनरेगा) विजया जाधव, उपविभागीय अधिकारी विशाल खत्री (IAS), वनसंरक्षक निरंजन दिवाकर (IFS), धानिवरीचे सरपंच शैलेश कोडा आणि उद्योगपती दिनेश शर्मा उपस्थित होते.=

Bamboo Farming
Bamboo Farming : पालघर जिल्ह्यात ‘मिशन बांबू लागवडी’स प्रारंभ

प्रवीण दराडे म्हणाले, ‘बांबूच्या माध्यमातून निश्चितपणे पालघर जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो.’ जिल्हाधिकारी जाखड म्हणाल्या, ‘बांबू लागवडीसाठी पालघर जिल्ह्यामध्ये मोठा वाव आहे. या लागवडीतून जिल्ह्यातून होणारे स्थलांतरदेखील रोखणे शक्य आहे.’

जाधव यांनी प्रास्ताविक केले. उद्योगपती शर्मा यांनी, बांबूपासून विविध प्रकारचे इंधननिर्मिती करणे शक्य असल्याचे सांगितले. त्यासाठी जिल्ह्यात प्रकल्प उभारून दोन लाख टन बांबू निर्मितीची तयारी असल्याचे सांगितले.

Bamboo Farming
Bamboo Cultivation : बांबू लागवडीतून पर्यावरण रक्षणाचे काम करावे

पाशा पटेल यांनी, बांबू लागवडीसाठी खड्डे, रोपे, देखभालीचा खर्च सर्व शासन स्तरावरून अनुदानाच्या रूपाने शेतकऱ्यांना मिळणार आहे याकडेही लक्ष वेधले.

धानिवरी गावाने सहकार्य दाखवून १००० बांबू उत्पादक शेतकरी उभे केल्यास आपण केंद्राच्या योजनेतून बांबूचे युनिट याच गावात उभे करू त्याचबरोबर महिला बचत गट आणि स्वयंरोजगाराच्या संधी गावातच निर्माण केल्या जातील. त्यासाठी शक्य झाल्यास गाव देखील दत्तक घेण्याची तयारी त्यांनी या वेळी दाखवली. सरपंच शैलेश घोडा यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com