Urea Bags : औद्योगिक वापरासाठी जाणारा साडेचार हजार बॅग युरिया जप्त

Seized the Bag Stock : कृषी आयुक्‍तालयाच्या पथकाने स्थानिक अधिकारी व पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यात तीन ठिकाणी छापेमारी केली. सोमवारी (ता. २६) छापेमारीत सुमारे ४६३२ बॅग साठा जप्त करण्यात आला.
Urea Bags
Urea BagsAgrowon
Published on
Updated on

Wardha News : शेतीसाठी असलेल्या युरियाचा औद्योगिक वापर होत असल्याच्या संशयावरून कृषी आयुक्‍तालयाच्या पथकाने स्थानिक अधिकारी व पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यात तीन ठिकाणी छापेमारी केली. सोमवारी (ता. २६) छापेमारीत सुमारे ४६३२ बॅग साठा जप्त करण्यात आला.

वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी औद्योगिक वापराच्या बॅगमधून शेतीसाठीच्या युरियाचा अवैधरीत्या वापर केला जात असल्याची गोपनीय माहिती कृषी आयुक्‍तालयाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पहिली कारवाई राजनी (ता. कारंजा घाडगे) येथील सुरींदर सिंह कोहली यांच्या गोदामात करण्यात आली.

Urea Bags
Illegal Seeds Seized : ‘अनधिकृत बियाण्यांचा २५ लाखांचा साठा जप्त’

या ठिकाणी औद्योगिक वापर असा उल्लेख असलेल्या ११६० बॅग (वजन ५० किलो प्रति) आढळून आल्या. दोन नमुने प्रयोगशाळेकामी तपासणीसाठी घेण्यात आले. उर्वरित साठा कारंजा घाडगे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

Urea Bags
Urea Stock Seized : कडेगावला ३७ लाख रुपयांचा बेकायदा युरियाचा साठा जप्त

दुसऱ्या पथकाने बाजारवाडा (ता. आर्वी) येथील मे. जी.बी. ऑईल प्रोडक्‍ट ॲण्ड वेअर हाऊसेस यांच्या बंद ऑईल मिलवर करण्यात आली. विजय बाजपेई यांच्या मालकीचे हे गोदाम आहे. या ठिकाणी २४३२ बॅग मिळून आल्या. तिसरी कारवाई पिंपळखुटा (ता. आर्वी) येथे संजय अग्रवाल यांच्या मालकीच्या गोदामावर करण्यात आली.

या ठिकाणी देखील ११३० बॅग आढळून आल्या. जप्त खताचा साठा हा खरांगणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. गुण नियंत्रण संचालक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनात मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, तंत्र अधिकारी गुणनियंत्रण चंद्रशेखर कोल्हे यांच्यासह पथकाकडन ही कारवाई करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com