Animal Husbandary Department : सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांत ४३ पदे रिक्त

Animal Husbandary Department Vacancy : शेतकऱ्यांकडील पाळीव जनावरांचे संवर्धन, संगोपन होऊन त्यांचे आरोग्य अबाधित राहावे, या उद्देशाने पशुवैद्यकीय दवाखाने सुरू झाले. मात्र, कर्मचाऱ्यांअभावी हे पशुवैद्यकीय दवाखाने पांढरे हत्ती ठरत आहेत.
Animal Husbandry Department
Animal Husbandry DepartmentAgrowon
Published on
Updated on

Sangali news : नवेखेड, जि. सांगली ः शेतकऱ्यांकडील पाळीव जनावरांचे संवर्धन, संगोपन होऊन त्यांचे आरोग्य अबाधित राहावे, या उद्देशाने पशुवैद्यकीय दवाखाने सुरू झाले. मात्र, कर्मचाऱ्यांअभावी हे पशुवैद्यकीय दवाखाने पांढरे हत्ती ठरत आहेत. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागात ४३ पदे रिक्त असल्याने पशुसंवर्धनाची मोहीम केवळ कागदावरच वृद्धिंगत होत असल्याचे दिसून येते.

शेतकऱ्यांकडील पाळीव जनावरांवर उपचार होऊन त्यांचे संगोपन व संवर्धन व्हावे, यासाठी राज्य शासनाने पशुसंवर्धन दवाखाने सुरू केले. गावोगावी अगदी चांगल्या दर्जाच्या इमारती अगदी दिमाखात उभ्या आहेत. मात्र, या दवाखान्यांत पशुवैद्यकीय अधिकारी, परिचर नसल्याने ते शोभेची वास्तू बनले आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे १०१ व राज्य शासनाचे ४० दवाखाने आहेत. पशुधन विकास अधिकारीची ८६ पदे मंजूर असून त्यापैकी ५९ पदे भरलेली आहेत तर २७ पदे रिक्त आहेत.

Animal Husbandry Department
Animal Husbandry : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

पशुधन पर्यवेक्षकची ६२ पदे मंजूर असून पैकी ४८ पदे भरलेली आहेत, तर १४ पदे रिक्त आहेत. सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची १६ पदे मंजूर असून १४ भरली आहेत, तर २ रिक्त आहेत. शिवाय जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी पशुचिकित्सालयाची दिमाखदार इमारत उभी आहे. परंतु या दवाखान्यात कुठे पशुवैद्यकीय अधिकारी नाहीत, तर कुठे परिचरच नाहीत, अशी अवस्था असल्याने जनवारांवर वेळवर उपचार करणे अवघड झाले आहे. रिक्त पदांमुळे योजनांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

पशु वैद्यकांचे गावोगावी पेव खासगी पशुवैद्यकीय सेवा करणारे अनेक पशु वैद्यकांचे सध्या गावोगावी पेव फुटले आहे. ते शासकीय स्तरावर पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी संख्या अपुरी असल्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत. उपचारांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात उत्पादक शेतकऱ्यांकडून रक्कम काढली जाते. यावर कुणाचे नियंत्रण नाही, अशी अवस्था आहे. त्यांची पदवी, कामाचा अनुभव हा संशोधनाचा विषय आहे.

सधन सांगली जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची ही अवस्था लाजीरवाणी गोष्ट असून तातडीने रिक्त पदे भरावीत.

- भागवत जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com