Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीनला ४१०० ते ४५६० रुपये दर

Hingoli Soybean Market Price : कमाल दरात १०० ते १५० रुपयांनी सुधारणा
Soybean Rate
Soybean RateAgrowon

Hingoli Soybean Market : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात बुधवारी (ता. २६) सोयाबीनची ८५१ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४१०० ते कमाल ४५६० रुपये तर सरासरी ४३३० रुपये दर मिळाले. गेल्या दोन दिवसांत सोयाबीनच्या कमाल दरात १०० ते १५० रुपयांनी सुधारणा झाली आहे.

हिंगोली धान्य बाजारात सध्या सोयाबीनची दैनंदिन ३०० ते ८५१ क्विंटल आवक सुरू आहे. मागील आठवड्यात एकूण ४४०१ क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल किमान ४००० ते कमाल ४५६० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २५) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४१०० ते कमाल ४५६० रुपये तर सरासरी ४३३० रुपये दर मिळाले.

Soybean Rate
Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ४९०० ते ५५३५ रुपये दर

सोमवारी (ता. २४) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४१०० ते कमाल ४५५० रुपये तर सरासरी ४३२५ रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. २२) ६५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४१०० ते कमाल ४४५० रुपये तर सरासरी ४२७५ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. २१) ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४०४० ते कमाल ४४६० रुपये तर सरासरी ४२५० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. २०) सोयाबीनची ३०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४०५० ते कमाल ४४५१ रुपये तर सरासरी ४२५० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १९) सोयाबीनची ७०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४००० ते कमाल ४४७० रुपये तर सरासरी ४२३५ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com