Farmers Death : पाच वर्षांमध्ये ४०१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Agriculture Issue : जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२४ या वर्षभरात ७४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
Farmer Death
Farmer DeathAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२४ या वर्षभरात ७४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी शासनाकडून देण्यात येत असलेल्या १ लाख रुपये आर्थिक मदतीसाठी पात्र ३३ प्रकरणे आहेत; तर १९ प्रकरणे अपात्र आहेत. एकूण २२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. मदतीसाठी पात्र ठरलेल्या ३३ पैकी १० प्रकरणांतील शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळाली आहे.

दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आदी नैसर्गिक संकटे त्यामुळे झालेली नापिकी, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे परभणी जिल्ह्यात २०२० ते २०२४ या ५ वर्षांच्या कालावधीत ४०१ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविलीगतवर्षी (२०२४) जानेवारी महिन्यामध्ये शेतकरी आत्महत्या नव्हती.

फेब्रुवारीमध्ये ६ शेतकरी आत्महत्या, मार्चमध्ये ४, एप्रिलमध्ये २, मे महिन्यात ८, जून महिन्यात ११ शेतकरी आत्महत्या झाल्या. जुलै महिन्यात ८, ऑगस्टमध्ये ७, सप्टेंबरमध्ये ४, ऑक्टोबरमध्ये ८, नोव्हेंबर ६, डिसेंबर महिन्यात १० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. परभणी जिल्ह्यात मागील २५ वर्षांपासून अनियमित पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आदी नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसायातून उत्पन्नाची शाश्‍वती राहिली नाही.

Farmer Death
Farmer Death Compensation : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचे पैसे तत्काळ द्यावे

शेतीमालास मिळणाऱ्या कमी बाजारभावामुळे अनेक वर्षी उत्पादन खर्चाएवढेही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्जबाजारीपणा वाढत आहे. कर्ज वसुलीसाठी बँका तसेच सावकारांनी तगादा लावल्यामुळे तसेच इतर कारणांनी नैराश्यग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. विविध विभागांच्या शासकीय योजना गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. एक

वर्षाआड दुष्काळाचे दुष्टचक्र सुरूच आहे. त्यात शेतकरी भरडले जात आहेत. परिणामी, जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. २०२२ मध्ये जिल्ह्यातील ७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २०२३ मध्ये १०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या तुलनेत २०२४ मध्ये शेतकरी आत्महत्यांची संख्या कमी झाली आहे. परभणी जिल्ह्यात २००६ ते २०२४ या १९ वर्षांच्या कालावधीत १ हजार १०७ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

Farmer Death
Farmer Death Measures : मानसिक आरोग्य शिबिरे, समुपदेशन सेवांची स्थापना करणार

२०२० ते २०२४ या पाच वर्षांत एकूण ४०१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी शासनाकडून देण्यात येत असलेल्या १ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी २६१ प्रकरणे मदतीसाठी पात्र, तर ११० प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. संबंधित तालुक्यांना निधी वितरित करण्यात आला आहे. परंतु व्हर्च्युअल पेमेंट डिपॉझिट अकाउंट प्रणालीमुळे मदत मिळण्यास विलंब लागत असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

परभणी जिल्हा शेतकरी आत्महत्या प्रकरणे स्थिती

वर्षे एकूण प्रकरणे पात्र अपात्र

२०२० ६४ ४९ १५

२०२१ ८३ ६५ १८

२०२२ ७७ ५७ १०

२०२३ १०३ ५७ ३७

२०२४ ७४ ३३ १९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com