Drought Crisis : सोलापूर जिल्ह्यातील आणखी ४० मंडलांचा दुष्काळी यादीत समावेश

Drought Condition : यंदाच्या हंगामात ज्या महसूल मंडलांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
Drought Condition
Drought Conditionagrowon
Published on
Updated on

Solapur News : यंदाच्या हंगामात ज्या महसूल मंडलांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरातील ४० मंडलांचा समावेश झाला आहे. या मंडलात आता दुष्काळी उपाययोजना लागू होणार आहेत.

प्रामुख्याने पावसाचा खंड, सरासरीपेक्षा कमी पाऊस, घटलेली पाणीपातळी आणि प्रकल्पातील पाणीसाठा अशा बाबींचा सॅटेलाईटद्वारे ऑनलाइन सर्व्हे करण्यात येऊन राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यात काही ठरावीक तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा आणि बार्शी या पाच तालुक्यांचा समावेश केला.

Drought Condition
Drought Condition : सातारा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

पण वास्तवातील परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे सरसकट जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमितीसमोर चर्चा झाली आणि त्यात राज्यातील अन्य मंडलाबरोबर ४० मंडलांचा समावेश करण्यात आला आहे.

Drought Condition
Maharashtra Drought : राज्यात ९५९ मंडलांत नव्याने दुष्काळ जाहीर

‘मंडलांची यादी पडताळून पुन्हा प्रस्ताव पाठवा’

उत्तर सोलापुरातील तिऱ्हे, दक्षिण सोलापुरातील मंद्रूप, होटगी, निंबर्गी, विंचूर, अक्कलकोट तालुक्यातील किणी, जेऊ, तडवळ, करजगी, दुधनी, मैंदर्गी, मोहोळ तालुक्यातील कामती व वाघोली, पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर, भंडीशेगाव, भाळवणी, करकंब, पटवर्धन कुरोली, पुळूज, तुंगत, कासेगाव आदी ४० मंडळांचा त्यात समावेश आहे.

पण ही मंडलेही तुलनेने कमीच आहेत. वास्तविक, सर्व जिल्ह्यांत दुष्काळाची परिस्थिती आहे. यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही कोणती मंडले यात समाविष्ट आहेत, याची माहिती अद्याप आलेली नाही. पण त्याची पडताळणी करून, गरज वाटल्यास आणखी नव्याने काही मंडलांचा प्रस्ताव पाठवू, असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com