Onion Subsidy : सोलापुरात कांदा अनुदानासाठी ३८ हजार शेतकरी पात्र

Onion farmer : १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या दोन महिन्यात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. तत्पूर्वी, अनुदानाचा निर्णय सरकारने २२ मार्च रोजी घेतला
Onion
Onionagrowon

Solapur news : कांद्याचे दर घसरल्यामुळे देण्यात येणाऱ्या कांदा अनुदानासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांकडे कांदा विक्री केलेल्या ४६ हजार ९० शेतकऱ्यांचे प्रस्ताव आले. पण प्रस्तावांच्या छाननीनंतर त्यातून ३८ हजार २०४ शेतकरी पात्र ठरले. आता या शेतकऱ्यांना १०१ कोटी १६ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

Onion
Onion Subsidy : कांद्याचे सरसकट अनुदान १५ ऑगस्टपर्यंत ; विधानपरिषदेत पणनमंत्री सत्तार यांची घोषणा

कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने दोनशे क्विंटलपर्यंत प्रतिक्विंटलसाठी ३५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. पण अद्याप हे अनुदान मिळालेले नाही. त्यासाठी दाखल प्रस्तावांच्या छाननी प्रक्रियेत हा वेळ गेल्याने अनुदान देण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले. पण आता लवकरच हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Onion
Onion Subsidy : कांद्याचे जाहीर केलेले अनुदान तातडीने द्या

त्यात सोलापूर बाजार समितीच्या माध्यमातून ३८ हजार ३९५ शेतकऱ्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केले. त्यापैकी ३१ हजार ४४२ शेतकरी पात्र ठरले. कुर्डुवाडी बाजार समितीच्या माध्यमातून ४८२ प्रस्ताव आले, त्यात ४७८ शेतकऱ्यांचे प्रस्ताव पात्र ठरले. पंढरपूर बाजार समितीच्या माध्यमातून ३२८ प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी ३२५ प्रस्ताव पात्र ठरले. बार्शी बाजार समितीतून नऊशे प्रस्ताव दाखल केले. त्यातून ८४७ शेतकरी पात्र ठरले. तर बार्शीतीलच खासगी लक्ष्मी सोपान बाजार समितीकडून ५ हजार ७३० शेतकऱ्यांचे प्रस्ताव आले, त्यातून ४ हजार ८७४ शेतकरी पात्र ठरले.

अपात्र शेतकरी आणि त्याची कारणे

जिल्ह्यातून तब्बल ७ हजार ८८६ शेतकरी या अनुदानासाठी अपात्र ठरले आहेत. त्यासाठी केलेल्या पडताळणीत कांद्याची सात-बारा उताऱ्यावर नोंद नसणे, अनुदान कालावधीत कांदा नसणे, कांदापट्टी नसणे, परवानाधारक अडत्याकडे विक्री नसणे, प्रतीज्ञापत्रावर स्वाक्षरी नसणे, मुदतबाह्य कांदापट्टी, दुबार अर्ज, आधार कार्डावरील नावात तफावत असणे, संमतिपत्र सादर न करणे, यांसारख्या कारणांचा समावेश आहे. या कारणांमुळे हे प्रस्ताव अपात्र ठरवण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com