Agricultural Plantation Projects: ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्यासह हरित आच्छादन विस्तारण्यासाठी जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये ३५ हजार केसर आंबा कलमांची लागवड करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. .राजुरा तालुक्यातील भेंडवी येथे जिल्हाधिकारी पंत यांच्या हस्ते या मोहिमेचा जिल्हास्तरीय प्रारंभ करण्यात आला..Kesar Mango Farming: केसर आंबा शेतीला शास्त्रशुद्ध, व्यावसायिक दिशा.या उपक्रमासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून उच्च दर्जाची ३५ हजार केशर आंबा कलमे मागविण्यात आली आहेत..Kesar Mango Quality Centre: केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे बळकटीकरण.कलमांची शास्त्रीय पद्धतीने लागवड व योग्य संगोपन व्हावे, यासाठी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अमोल दडमल यांनी ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांना लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन व संगोपनाबाबत प्रशिक्षण दिले..लागवडीसोबत जलसंधारणालाही प्राधान्य देण्यात आले. राजुरा पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून भेंडवी येथे वनराई बंधारा उभारला. यामुळे पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढविण्यासह आंबा कलमांच्या संगोपनासाठी मदत होणार आहे. दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे आणि पर्यावरण संवर्धन साधणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.