Agrim Crop Insurance : छत्रपती संभाजीनगरमधील ३२१ गावांना मिळणार ‘अग्रिम’ भरपाई

Advance Crop Insurance : छत्रपती संभाजीनगरमधील पावसाचा खंड पडल्याने पीक विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूलता याबाबीखाली शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्याची अधिसूचना जारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी
Agrim crop insurance
Agrim crop insuranceAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati sambhaji nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामाची स्थिती बिकट झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडलांत पावसाचा १६ ते ४० दिवसांचा खंड पडला आहे. तथापि, २० महसूल मंडलांत सलग २१ किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचा खंड पडला आहे. तेथील पिकांच्या उत्पादनात ५० टक्के घट येणार असल्याचा अंदाज तालुकास्तरीय समितीने व्यक्त केला आहे. त्यानुसार पीक विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूलता याबाबीखाली शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई देण्याची अधिसूचना जारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी (ता. ५) दिले. यामुळे ३२१ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Agrim crop insurance
Crop Insurance : शेतकऱ्यांना अग्रिम विमा भरपाई देण्याचे आदेश

पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीबाबत जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक मंगळवारी झाली. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, विमा कंपनी, स्कायमेट प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी आदी या वेळी उपस्थित होते.

Agrim crop insurance
Rohit Pawar : शेतकऱ्यांना विम्याचे पंचवीस टक्के अग्रिम द्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र ६८४७१६.४ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ६५८१२३.२४ हेक्टर पेरणी झाली आहे. ऑगस्ट २०२३ अखेर ४३१.२ मिमी पर्जन्यमान अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २७६.६ मिमी म्हणजेच ६४.१४ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले आहे. जुलै व ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडलांत १६ ते ४० दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. परिणामी खरीप पिकांची अवस्था बिकट आहे. सलग २१ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड असलेली २० महसूल मंडळे जिल्ह्यात आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ४, फुलंब्री १, वैजापूर १० व गंगापूर तालुक्यातील ५ महसूल मंडले आहेत.   या अंतर्गत ३२१ गावे असून त्यांचे सर्व्हेक्षण तालुकास्तरीय समितीमार्फत झाले आहे.

उत्पादकतेत ५० टक्क्यांवर घट शक्य

तालुकास्तरीय समितीच्या अहवालानुसार मका, कापूस व सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीकविमा योजनेतील मध्यहंगाम प्रतिकूलता याबाबीखाली मका, कापूस व सोयाबीन पिकांचा विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के अग्रिम नुकसान भरपाई मिळते. ही बाब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com