NDCC Bank : नाशिक जिल्हा बँकेच्या थकबाकीदारांच्या ३२ ट्रॅक्टरचा होणार लिलाव

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जवसुलीकरिता धडक मोहीम हाती घेतली आहे.
District Bank
District BankAgrowon

Nashik News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Nashik District Central Cooperative Bank) थकीत कर्जवसुलीकरिता धडक मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा बँकेची वाहन, ट्रॅक्टर कर्जाची (Tractor Loan) मोठी थकबाकी झालेली असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. त्यानुसार पेठ तालुक्यातील ३२ ट्रॅक्टर जप्त केले होते.

त्यांची शासन मान्यताप्राप्त मूल्यांकनकार यांच्याकडून मूल्यांकन प्राप्त करून मागील वर्षी १६ एप्रिल २०२२ रोजी जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता.

या लिलावाविरुद्ध काही थकबाकीदार सभासदांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर तात्पुरती स्थगिती न्यायालयाने दिलेली होती. मात्र ही स्थगिती उठवली असून या वाहनांचा लिलाव होणार असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे यांनी दिली.

जिल्ह्यातील २०१५-१६ पूर्वीचे मोठे व प्रभावशाली तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१चे नियम १०१नुसार कारवाई करून मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर थकबाकीच्या कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

District Bank
Mahindra & SBI Tractor Finance Agreement : महिंद्राने केला एसबीआयशी करार; मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार कर्ज

न्यायालयात वेळोवेळी झालेल्या सुनवण्यांमध्ये बँकेने दिलेले कर्ज हे मालमत्तेकरिता दिलेले असून या मालमत्तेचे मूल्यांकन दिवसेंदिवस कमी होत असून कर्जदाराचे व बँकेचेही नुकसान होत आहे.

त्यामुळे जप्त केलेल्या ३२ ट्रॅक्टर वाहनांच्या लिलाव प्रक्रियेस दिलेली स्थगिती उठविण्यात यावी, अशी विनंती केली होती.

त्यानुसार उच्च न्यायालयाने मागील वर्षी १३ एप्रिल २०२२ रोजी दिलेली स्थगिती उठवून या जप्त केलेल्या ३२ ट्रॅक्टरचा लिलाव करण्यासाठी ३० मार्च २०२३ च्या आदेशान्वये परवानगी दिली असल्याने या ३२ ट्रॅक्टरचा लिलाव लवकर करण्यात येणार आहे.

जिह्यातील थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून थकबाकीचा भरणा करून बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील पंधरा दिवसांत ३२ ट्रॅक्टरचा लिलाव होणार असल्याचे बँकेकडून कळविण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com