Agricultural Investment: कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीसाठी २५ हजार कोटी

Cabinet Meeting Decision: कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीसाठी नवीन योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी पुढील पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
Cabinet Meeting
Cabinet Meeting Agrowon
Published on
Updated on

Pune News: कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीसाठी नवीन योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी पुढील पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दरवर्षी ५ हजार कोटी रुपये याप्रमाणे पुढील पाच वर्षांत एकूण २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २९) मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात पीकविमा योजनेतील सुधारणेसह शेती क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याचा निर्णयाला मान्यता देण्यात आली.

Cabinet Meeting
Cabinet Meeting: महिला, बालविकास, कृषी आणि EV धोरणासंदर्भात राज्याचे नवे निर्णय

राज्य सरकार शेतीतील पायाभूत सुविधा निर्मितीवर लक्ष देणार असल्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी सांगितले. तसेच या योजनेतून अत्यल्प, अल्प भूधारक, दिव्यांग आणि महिला शेतकरी यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी लाभार्थीचा जिल्हानिहाय लक्ष्यांक निश्चित करण्यात येणार असून,

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर योजना राबविण्यात येणार असल्याचे रस्तोगी यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतीतील भांडवली गुंतवणुकीला चालना देण्याबद्दल सूतोवाच केले होते. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करण्यात आला.

Cabinet Meeting
Government Scheme : ‘जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी’ योजनेमुळे अनेक प्रश्न निकाली

शेतकऱ्यांना हवामानातील बदलांनी तोंड देता यावे, यासाठी भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे. तसेच कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी शेततळे, सूक्ष्म सिंचन, ठिबक/तुषार सिंचन यासारख्या बाबींवर या योजनेतून भर देण्यात येणार आहे.

तर नियंत्रित शेतीसाठी शेडनेट, हरितगृह, पॉलिहाउस, संरक्षित शेती, प्लॅस्टिक अस्तरीकरण, मल्चिंग पेपर, क्रॉप कव्हर, काटेकोर शेती, पॅक हाउस, गोदाम, कोल्ड स्टोअरेज, काढणी पश्‍चात व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया, मूल्य साखळी विकसन, शेतीमालाच्या ब्रॅंडिंग, पॅकेजिंग, साठवणूक सुविधेसाठी गोदाम, कोल्ड स्टोअरेज,

पॅक हाउस आदी सुविधांसाठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. शेतकऱ्यांसाठी शेळी पालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योग इत्यादी बाबींसाठी साह्य/अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने एकूण पुढील ५ वर्षांत २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यास मान्यता दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com