Voter Registration : नव्या २३,४७५ मतदारांची अहिल्यानगर जिल्ह्यात नोंद

Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीचे आवाहन केले होते.
Voter Registration
Voter RegistrationAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात २३ हजार ४७५ नवीन मतदारांची वाढ झाली आहे.

राहुरी मतदारसंघातील सर्वाधिक २ हजार ९७१, तर कोपरगाव मतदार संघात सर्वांत कमी १२४५ मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे. आता विधानसभेसाठी जिल्ह्यात ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार झाले आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत सुमारे ३ लाख १९ हजार मतदार वाढले आहेत.

Voter Registration
Maharashtra Election 2024 : सिंचनासाठी पाणी, वीज, शेतरस्त्यांच्या समस्या वर्षानुवर्षे कायम

विधानसभेची निवडणूक होत आहे. निवडणूक कार्यक्रम १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला आहे. मतदार होण्यासाठी जे पात्र आहेत. मात्र, मतदारयादीत नाव नाही, अशा सर्व नागरिकांना आचारसंहिता लागू झाल्यानंतरही २९ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करण्याची संधी प्रशासनाने दिली होती.

Voter Registration
Maharashtra Election 2024 : प्रचाराच्या धुराळ्यात हरवले शेतकऱ्यांचे प्रश्‍न

त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात २३ हजार ४७५ मतदारांची नोंद केली. यामध्ये १० हजार ४४ पुरुष, तर १३ हजार ४३० महिला व इतर एकाचा समावेश आहे. नवीन मतदारांच्या नावांचा समावेश असलेली पुरवणी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नव्याने नोंदणी झालेल्यांत अकोल्यामध्ये १३८१, संगमनेरमध्ये १९४७, शिर्डीमध्ये २१२१, कोपरगावमध्ये १२४५, श्रीरामपूरमध्ये १३९८, नेवाशात २२१५, शेवगावमध्ये १९६६, राहुरीमध्ये २९७१, पारनेरमध्ये १७७७, अहिल्यानगर शहरात २२१५, श्रीगोंद्यात २१३१, व कर्जत-जामखेडमध्ये २१०८ नवीन मतदान नोंद झाली. त्यामुळे आता विधानसभेसाठी जिल्ह्यात ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार झाले आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत सुमारे ३ लाख १९ हजार मतदार वाढले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com