Agriculture Projects : ‘कृषी, पशुसंवर्धना’साठी २३,३०० कोटींचे प्रकल्प

Agriculture, Animal Husbandry Sector Projects : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील कृषी, पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित २३ हजार ३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.
PM Narendra Modi
PM Narendra ModiAgrowon
Published on
Updated on

Washim News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील कृषी, पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित २३ हजार ३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे शनिवारी (ता. ५) पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे सांस्कृतिक प्रतीक असलेल्या ‘नंगारा भवन’ या सांस्कृतिक संग्रहालयाचे उद्‌घाटनही करण्यात आले.

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशीम येथे सुमारे ९.४ कोटी शेतकऱ्यांना सुमारे २० हजार कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता वितरित केला. तसेच पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचेही वितरण केले.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : काँग्रेस लूट आणि फसवणुकीचे संपूर्ण पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठाण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल

या वेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री राजीव रंजन ऊर्फ ललन सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते.

PM Narendra Modi
Narendra Modi and Rahul Gandhi : निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदी वाशीममध्ये तर राहुल गांधी कोल्हापुरमध्ये दाखल

पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ) अंतर्गत कस्टम हायरिंग सेंटर, प्राथमिक प्रक्रिया युनिट, गोदामे, वर्गीकरण आणि प्रतवारी केंद्र, कोल्ड स्टोअरेज प्रकल्प, काढणीपश्चात व्यवस्थापन प्रकल्प, तसेच या वेळी सुमारे १३०० कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असलेले ९२०० शेतकरी उत्पादक संघटनांचे (एफपीओएस) लोकार्पण या वेळी करण्यात आले.

पशुधनासाठी युनिफाइड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा प्रारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांना पशुधनात वाढ करण्यासाठी परवडणाऱ्या किमतीत लिंग-वर्गीकृत वीर्याची उपलब्धता वाढविण्याच्या आणि त्याची किंमत प्रति मात्रा सुमारे २०० रुपयांपर्यंत कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com