Onion Subsidy : सोलापुरातून कांदा अनुदानासाठी २२२ कोटींचा प्रस्ताव

Onion Rate : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील सात बाजार समित्यांमध्ये १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दोन महिन्यांत ६३ लाख ५५ हजार १८६ क्विंटल कांदा विकला गेला आहे.
Onion Subsidy
Onion SubsidyAgrowon

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह (Solapur Agriculture Produce Market Committee) जिल्ह्यातील सात बाजार समित्यांमध्ये १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दोन महिन्यांत ६३ लाख ५५ हजार १८६ क्विंटल कांदा विकला (Onion Selling) गेला आहे.

शासन निर्णयाप्रमाणे अंदाजे एक लाख शेतकऱ्यांसाठी २२२ कोटी ४३ लाख १५ हजार १०० रुपयांचे अनुदान लागणार आहेत. त्यासंबंधीची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी पणन मंडळाला सादर केली आहे.

अतिवृष्टीच्या संकटातून सावरणाऱ्या बळीराजाला कांद्याचे दर गडगडल्याने मोठा फटका सोसावा लागला. काही शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागली. अशावेळी राज्य सरकारने फेब्रुवारी व मार्च महिन्यांत कांदा विक्री केलेल्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

परंतु परराज्यांतून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी हे अनुदान नसणार आहे. शेतकऱ्यांनी अनुदानासाठी कांदा विक्री केलेली आडत व्यापाऱ्यांकडील पावती, सात-बारा उतारा व बॅंक बचत खाते क्रमांक जोडून साध्या कागदावर अर्ज करावा, अशा सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

Onion Subsidy
Onion Subsidy : राज्यातील ७० टक्के शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित

‘कांदा आवक’ची होणार पडताळणी

कांदा अनुदानासंबंधीचा शासन निर्णय ३१ मार्चपूर्वी काढण्यात आला आणि अनेक ठिकाणी बनावटगिरी झाल्याची चर्चा झाली.

डिसेंबर जानेवारीत कांदा विकलेल्यांच्या नावे पुन्हा फेब्रुवारी-मार्चमध्ये कांदा विक्रीच्या रितसर पावत्या तयार करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन महिन्यांतील संपूर्ण व्यवहाराची पडताळणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सहमतीने ‘त्या’ व्यक्तीलाच मिळेल अनुदान

सातबारा आई किंवा वडिलांच्या नावे आहे, पण कांदा विक्री मुलाने किंवा त्यांच्या कुटुंबातील दुसऱ्या व्यक्ती केली आहे. अशावेळी विक्रीपट्टी मुलाच्या किंवा इतर सदस्यांच्या नावे असल्यास उतारा ज्यांच्या नावे आहे, त्यांनी सहमती दिल्यास त्या व्यक्तीच्या नावे अनुदान वितरित केले जाणार आहे.

कांदा विक्रीपट्टी ज्याच्या नावे आहे, त्याने सातबारा उतारा ज्याच्या नावे, त्याचे बॅंक डिटेल्स दिल्यास त्यांना अनुदान मिळणार आहे.

सात बाजार समित्यांमध्ये १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दोन महिन्यांत ६३ लाख ५५ हजार १८६ क्विंटल कांदा विक्री झाला. त्यासंबंधीची माहिती बाजार समित्यांनी दिली असून, त्याचा प्रस्ताव पणन मंडळाला पाठवला आहे.
किरण देशमुख, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com