Akluj APMC : अकलूज बाजार समितीत डाळिंबाला २२१ रुपये दर

Pomegranate Rate : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये दिवसेंदिवस डाळिंबाला चांगला दर मिळत आहे.
Pomegranate
Pomegranate Agrowon

Solapur News : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये दिवसेंदिवस डाळिंबाला चांगला दर मिळत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने डाळिंबाला चांगला उठाव मिळत आहे. मंगळवारी (ता. २१) विक्री झालेल्या डाळिंबास सर्वाधिक प्रतिकिलो २२१ रुपयांचा दर मिळाला.

Pomegranate
Pomegranate Market Rate : डाळिंब दरात प्रतिकिलो २५ ते ३५ रुपयांनी सुधारणा

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये दररोज लिलाव होत असतात. एरवी डाळिंबाची रोज सहा ते सात हजार क्रेट आवक होते, पण सध्या दररोज सुमारे अडीच हजार ते तीन हजार क्रेटची आवक होत आहे.

जवळपास निम्म्याने आवक कमी आहे. बाजार समितीत शेतकरी-व्यापाऱ्यांना खरेदी-विक्रीच्या सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी बाजार समितीकडून सतत प्रयत्न केले जातात. त्यामुळे डाळिंब मार्केटमध्ये माळशिरससह शेजारील अनेक तालुक्यातूनही डाळिंबाची आवक होते.

Pomegranate
Pomegranate Rate : २० किलो डाळिंबाला मिळाला ८ हजार रुपये भाव

खुळेवाडी येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अजित खुळे यांच्या डाळिंबाला हा दर मिळाला. त्यांनी विठ्ठल फ्रुट कंपनीकडे २५ क्रेड डाळिंब आणले होते, त्यातील ३ क्रेट डाळिंबाला २२१ रुपये प्रतिकिलोप्रमाणे दर मिळाला.

तर उर्वरित डाळिंबही त्याच्या प्रतिनुसार विकले गेले. या वेळी डाळिंब व्यापारी खंडू जाधव, नागेश केदार, सादिक बागवान, राजुभाई बागवान, सरपंच रावसाहेब भोसले यासह सांगोला, पंढरपूर, करकंब व अकलुज परिसरातील व्यापारी हजर होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, यासाठी प्रयत्न केला जातो. शेतकरी, व्यापारी यांना आवश्यक त्या सोई-सुविधा पुरवण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळेच आमच्याकडे शेतीमालाची आवक चांगली होते.
- राजेंद्र काकडे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज
माझ्याकडे सुमारे तीन एकर डाळिंबाची बाग आहे. मी नेहमी अकलूज डाळिंब बाजारात डाळिंब आणत असतो. चोख व्यवहार आणि योग्य दरामुळे मला हा बाजार सोईचा वाटतो. गेल्यावेळीही सुदैवाने मला चांगला दर मिळाला होता.
- अजित खुळे, डाळिंब उत्पादक, खुळेवाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com