Pashu KCC : पशू किसान क्रेडिट कार्डसाठी २०३९ पशुपालकांनी केली नोंदणी

Pashu Kisan Credit Card Scheme : पशुपालकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पशू किसान क्रेडिट कार्ड हे बंधनकारक केले आहे.
Pashu KCC
Pashu KCC Agrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातील पशुपालकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पशू किसान क्रेडिट कार्ड हे बंधनकारक केले आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील पशू किसान क्रेडिट कार्डसाठी दोन हजार ३९ शेतकऱ्यांनी केली नोंदणी केली आहे. जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पुणे जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी केले.

Pashu KCC
kisan credit card : नवे २० लाख शेतकरी बनले ‘केसीसी’धारक

देशातील पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवते. देशातील शेतकऱ्यांसाठी भारत सरकारने आता पशू किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेमध्ये सर्व पशुपालकांना व्यवसाय वाढीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाख ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. तेही फक्त चार टक्के व्याजदराने मिळणार आहे.

पशू किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे?

  •  ज्या शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस, बकरी आणि कोंबड्या आहेत, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार.

  •  मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार.

  •  पशुपालन आणि मत्स्यपालनात प्रोत्साहन देऊन त्याला उभारी देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

  •  केंद्र सरकार या योजनेसाठी पशुपालकांना १.६ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  •  कर्जासाठी तारण ठेवण्याची गरज नाही.

योजनेची प्रमुख उद्दिष्ट्ये

  • पशू किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पैशाच्या अभावी शेतकऱ्यांची किंवा पशुपालकांची जनावरे आजारी पडल्यास,  पैशाअभावामुळे गरीब पशुपालकांना त्यांच्या पशूंवर उपचार करता येत नाहीत.

  •  अशा परिस्थितीत पशू किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत केली जाईल.

  •  पशुपालक शेतकऱ्यांनाही पशुपालनास प्रोत्साहन मिळावे, यासाठी पशुपालक क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे.

  •  पशुसंवर्धन आणि देशातील पशुधनाची स्थिती सुधारणे हे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

आवश्यक पात्रता

  •  पशुपालक क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ हा देशातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

  •  ज्या शेतकऱ्यांकडे शेत जमीन कमी आहे.

  •  ज्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही.

  •   जे शेतकरी गाय, बकरी, म्हशी इत्यादी पशूंचे पालन

  • करतात.

  •   अशा सर्व शेतकरी आणि पशुपालकांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे.

Pashu KCC
Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

लाभ काय असणार आहे?

  •   पशू किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत, कोणताही शेतकरी एखाद्या गायीचा पाठपुरावा करत असेल, तर त्यांना प्रति गाय रु. १२,००० देण्यात येणार आहेत.

  •   तसेच म्हशी पालन करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यास पशू किसान क्रेडिट कार्डअंतर्गत प्रत्येक म्हशीला १४,००० रुपये देण्यात येणार आहेत.

  •   जर पशुपालक शेतकऱ्याने शेळीचे पालन केले असेल, तर त्याला शेळीगटसाठी २०,००० रुपये देण्यात येतील.

अर्ज कुठे करायचा?

 पशुपालकांना बँकेतून क्रेडिट कार्डची सुविधा देऊन लाभ देण्यात येतो. त्यासाठी इच्छुक लाभार्थी पशुपालक शेतकऱ्याला ऑफलाइन बँकेमार्फत पशुपालक क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावा लागेल.

क्रेडिट कार्डासाठी आवश्यक कागदपत्रे

  •   आधार कार्ड

  •   पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र

  •   बँक खात्याचे तपशील

  •   पासपोर्ट आकाराचा फोटो

  •   रेशन कार्ड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com