
Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात १९८८ मध्ये प्रवेशित बॅचच्या (ॲग्रीकॉस ८८) वर्गमित्रांचा सहकुटुंब स्नेहमेळावा ‘जरा विसाऊ या वळणावर’ शनिवारी (ता. ११) आणि रविवारी (ता. १२) खंडाळा (ता. पुणे) येथे पार पडला.
मुंबई ठाणे स्थित सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी, उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुने, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक रमेश बिराजदार, आंतरराष्ट्रीय कराधान विभागाचे आयकर आयुक्त संजय देशमुख, सहकार विभागाचे उपनिबंधक राजेंद्र गायकवाड, राज्य कर सहआयुक्त (वस्तू व सेवा) अप्पासाहेब गोर्डे, मंत्रालयातील सहसचिव संजय इंगळे, सहकारी संस्थाचे सहायक निबंधक सुनील कुलकर्णी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव विजय लहाने, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विजयकुमार थोरात, जीएसटीचे सहायक आयुक्त दीपक क्षीरसागर, बीएमसीच्या वृक्ष लागवाडचे अधीक्षक जीतू परदेशी आदी आयोजक होते. एकूण ७५ कुटुंबे त्यांच्या पाल्यासह सहभागी झाले.
या स्नेह मेळाव्याच्या सुंदर क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य सर्वांच्या मुलांना आणि सौभाग्यवतींना लाभले. आयुष्यात सत्ता, पद, पैसा, संपत्ती कधीही मिळवता येते. सच्चे मित्र सोबत असतील तर अंधारी रात्रही सुसह्य होते. मित्रत्वाचं हे वैभव आपणही जपलं पाहिजे, वाढवल पाहिजे हा त्यांच्या मनात फुटलेला अंकुर हे स्नेह मेळाव्याचं सर्वांत मोठं साफल्य होय.
रविकांत अडसूळ, भगवान आसेवार, गणेश बोळशेकर, शिवाजी बोचरे, कुमार बारकुल, अशोक भुजबळ, सुरेंद्र बर्डे, गजानन भातलवंडे, उद्धव बोरुळकर, जगन्नाथ भोसले, मधुकर चाबुकस्वार, नितीन चौधरी, कैलास देशमुख, भास्कर देशमुख, ज्ञानेश्वर इंगळे, नरसिंग जाधव,
बाबासाहेब जाधव, सुरेश जंपनगिरे, अनिल कदम, गोविंद कदम, विजयकुमार कऱ्हाळे, रावसाहेब कोलागणे, सोमेश्वर कारेगावकर, काशिनाथ कोटे, निवृत्ती कोल्हे, पारसमल ललवाणी, रामचंद्र माळी, दीपक मुळे, लक्ष्मण मोटे, प्रभाकर मुरकुटे, श्रीकांत मोरे, राधाकृष्ण मोटे, नंदकिशोर नाईनवाड आदी सहभागी झाले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.