PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’मधून शेतकऱ्यांच्या खात्यात १९३० कोटी जमा

PM Kisan 20th Installment: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या विसाव्या हप्त्यापोटी राज्यातील ९२.९१ लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात एकूण १९३० कोटी रुपयांपेक्षा अधिक शनिवारी (ता.२) जमा करण्यात आली आहे.
Agriculture Minister Dattatraya Bharane and Agriculture Commissioner Suraj Mandhare
Agriculture Minister Dattatraya Bharane and Agriculture Commissioner Suraj MandhareAgrowon
Published on
Updated on

Pune News: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या विसाव्या हप्त्यापोटी राज्यातील ९२.९१ लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात एकूण १९३० कोटी रुपयांपेक्षा अधिक शनिवारी (ता.२) जमा करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथील शेतकरी मेळाव्यात कळ दाबून ऑनलाइन पद्धतीने देशातील पात्र ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ‘पीएम-किसान’च्या विसाव्या हप्ता जमा केला. केंद्र शासनाने एकूण २२ हजार ५०० कोटी रक्कम जमा केले. या सोहळ्याला राज्यातून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हजेरी लावली.

Agriculture Minister Dattatraya Bharane and Agriculture Commissioner Suraj Mandhare
PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

या वेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे, पुण्याचे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, पुण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सरव्यवस्थापक संजय शितोळे उपस्थित होते.

देशातील शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’च्या एकोणिसाव्या हप्त्यापर्यंत ३.६९ लाख कोटी रुपये वाटले गेले आहेत. ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यानचा दोन हजार रुपयांचा विसावा हप्ता राज्यातील ९२ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळाला आहे. भूमिअभिलेख नोंदी, ई-केवायसी व बॅंक खाते आधार संलग्न असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जात आहे.

Agriculture Minister Dattatraya Bharane and Agriculture Commissioner Suraj Mandhare
Agriculture Minister Dattatray Bharne: शेतकऱ्याचा मुलगा ते कृषिमंत्री; दत्तात्रय भरणे यांचा प्रवास

आतापर्यंत या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ३५ हजार ५९५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन योजनेचा तपशील मिळवता येतो. याच संकेतस्थळावर ‘पीएम किसान बेनिफिशरी लिस्ट’वर कळ दाबताच नाव व आतापर्यंत जमा झालेले हप्ते याची माहिती जाणून घेता येते.

सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

‘पीएम-किसान’च्या निधी वितरण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण बघण्यासाठी कृषी विभागाने ठिकठिकाणी व्यवस्था केली होती. भारतीय पशू वैद्यकीय संशोधन संस्थेच्या पुणे विभागीय केंद्रातदेखील काही शेतकरी दूरदृश्य प्रणालीद्वारे या सोहळ्यास उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com