Nagpur News: नागपूर महानगरपालिकेकडून आधुनिक मच्छी मार्केटची उभारणी भांडेवाडी येथे करण्यात येणार असून यासाठी शासनाकडून १९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. .सध्या शहरातील विखुरलेल्या आणि अस्वच्छ ठिकाणी सुरू असलेल्या मासे विक्री केंद्रांना पर्याय म्हणून ही आधुनिक फिश मार्केट उभारले जाणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून तसेच मनपाच्या सहभागातून या मार्केटला मूर्त रूप दिले जाणार आहे..Fish Farmers Relief: राज्यात मत्स्य व्यावसायिकांना अतिवृष्टीच्या मदतीचे दर निश्चित.या ठिकाणी घाऊक व किरकोळ विक्रीसाठी स्वतंत्र विभाग, स्वच्छ मजले, अत्याधुनिक ड्रेनेज व्यवस्था, वैज्ञानिक पद्धतीने कचरा व्यवस्थापन आणि माशांच्या गुणवत्तेसाठी कोल्ड स्टोअरेज युनिट्सची सुविधा देण्यात येणार आहे. मंजूर निधीत सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे..त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मत्स्य उत्पादक संघटनांच्या अडचणी, त्यांना हव्या असलेल्या सोई सुविधा लक्षात घेत नियोजित जागेत वाहतूक व बाजार क्षेत्र सर्वेक्षण, तसेच जमिनीचे प्रोफाइलिंग करण्यात येणार आहे. डीपीआरमध्ये ऑटो-कॅड रेखाचित्रे, रचनात्मक आराखडे, खर्च अंदाजपत्रक, बार चार्ट वेळापत्रक आणि पर्यावरणीय सुरक्षेच्या बाबींचा समावेश असणार आहे..Fish Market: वादळ निवळल्यानंतर मासळीची आवक वाढली.रोज कोट्यवधींची होतेय उलाढालसध्या नागपूर फिश मार्केटमध्ये रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. नागपूरसह जवळच्या जिल्ह्यातही मासोळ्या विक्रीसाठी पाठविल्या जातात. सध्या शहरात केंद्रीकृत फिश मार्केट नसल्याने विक्रेत्यांना व मच्छीमारांना अस्वच्छ आणि असुविधाजनक परिस्थितीत व्यापार करावा लागतो आहे. भांडेवाडेतील हे नवीन मार्केट सर्व व्यवसाय एका छताखाली आणून खर्च कमी करेल, ग्राहकांना सुरक्षित उत्पादने मिळतील आणि मच्छीमारांना योग्य दर मिळेल..या प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यांची नेमणूक झाल्यावर सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्या नंतर निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार.-अल्पना पाटणे, कार्यकारी अभियंता प्रकल्प १, महानगरपालिका नागपूर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.