Road Development : बुलडाणा जिल्ह्यात १८४ किलोमीटर रस्त्यांचा केला जाणार विकास

जिल्ह्यातील चिखली, बुलडाणा व मेहकर तालुक्यांतील प्रमुख जिल्ह्यांबाबत हा निर्णय झाला असून, १८४ किलोमीटरचा विकास केला जाणार आहे.
 Road
RoadAgrowon

Buldana News : जिल्ह्यातील रस्त्यांचा विकास (Road Development) करण्याबाबत निर्णय झाला असून, जिल्हामार्ग राज्य मार्ग (State Highway) म्हणून दर्जोन्नत करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील चिखली, बुलडाणा व मेहकर तालुक्यांतील प्रमुख जिल्ह्यांबाबत हा निर्णय झाला असून, १८४ किलोमीटरचा विकास केला जाणार आहे. आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव ग. सं. कचरे यांनी काढला आहे.

अमरावती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या वतीने जिल्ह्यातील चिखली, बुलडाणा, मेहकर तालुक्यातील जिल्हा रस्त्यांना राज्य मार्गांचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.

 Road
रिंग रोड, रेल्वे प्रकल्पाला जमिनी देण्यास विरोध

या रस्त्यावरील गावांची संख्या, लोकसंख्या, रस्त्यावर होणारा वापर याचा विचार करून सदर रस्ते राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला.

यानुसार गिरोला, सवना, दिवठाणा, बोरगाव वसू, खंडाळा मकरध्वज ते भालगाव, रोहडा, मेरा बुद्रुक हा २७ किलोमीटरचा जिल्हा रस्ता राज्य मार्ग होणार आहे.

दरम्यान, काटोला, रान अंत्री, हिवरखेड, आमखेड, एकलारा, करतवाडी, टाकरखेड, करवंट, श्रीकृष्ण नगर हा २५ किलोमीटरचा रस्ता, उदयनगर, तोरणवाडा, आसोलानाईक, किनीनाईक, वडाळी, मांडवा, पारखेड फाटा, पार्डी फाटा, घाटपुरी ते टेंभुर्केड असा ४० किलोमीटरचा रस्ता आहे.

 Road
Road Safety : ‘कृषी’चे विद्यार्थी शेती शिक्षणासह गिरविणार रस्ता सुरक्षिततेचे धडे

तर कोलारी, किन्होळा, सवणा, हातणी, वळती, सोमठाणा, देवठाणा, पेठ, अन्वी, शेलगाव जहागीर, मुंगसरी, खैरव, गांगलगाव, रोहडा ते रमणा ५१ किलोमीटरचा रस्ता, रमणा ते मढ, घुम्मी, तराळखेड, मासरूळ, धामणगाव, टाकळी, कुंबेफळ, कुलमखेड, मोंढाळा, मसला बुद्रूक, बोधेगाव, चांडोळ, भडगाव हा ४३ किलोमीटर रस्ता असे १८४.४०० किमीचे जिल्हा मार्ग असणारे रस्ते राज्य मार्ग म्हणून परिवर्तित केले जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com