Goat Market : तळेगाव ढमढेरे येथील बाजारात १८०० शेळी, मेंढ्यांची विक्री

Talegaon Dhamdhere Market Update : येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात सोमवारी (ता. २१) सुमारे १८०० शेळी, मेंढी व बोकडांची विक्री झाली.
Goat Market
Goat MarketAgrowon
Published on
Updated on

Shirur News : येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात सोमवारी (ता. २१) सुमारे १८०० शेळी, मेंढी व बोकडांची विक्री झाली असल्याची माहिती प्रशासक अरुण साकोरे, सचिव अनिल ढोकले व सहायक सचिव अनिल ढमढेरे यांनी दिली.

Goat Market
Goat Sheep Subsidy : मिल्किंग मशिनसह शेळी-बोकड गट मिळणार अनुदानावर

येथील उपबाजारात शेळी व बोकडाला १० हजार ते १९ हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच मेंढीला सहा हजार ते १० हजारापर्यंत बाजारभाव मिळाला आहे.

Goat Market
Goat Market : बकरी ईद निमीत्त जनावरांचा बाजार फुलला, अठरा लाखांचा बोकडाची जोरदार चर्चा

येथील शेळी, मेंढी बाजारात पुणे - अहिल्यानगर, सातारा, अलिबाग, मुंबई येथून व्यापारी आले होते. तसेच पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पशुपालक, मेंढपाळ व शेतकरी यांनी शेळी, मेंढी व बोकड विक्रीकरिता आणले होते.

दरम्यान, येथील बाजारात शेळी, बोकड व मेंढीला ऐन दिवाळी सणाला समाधानकारक बाजारभाव मिळाल्याने शेतकरी व पशुपालकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच भुसार बाजारात सोयाबीनच्या २०० डागांची आवक झाली असून, ३९०० ते ४३०० रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com