
Akola News : कृषी क्रांतीचे प्रणेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करताना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सात तालुक्यांतील १८ प्रगतशील शेतकऱ्यांचा मंगळवारी (ता. १) गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, अतिरिक्त ‘सीईओ’ विनय ठमके, प्रकल्प संचालक मनोज जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी माया शिर्के, मोहीम अधिकारी महेंद्र सालके, जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद जंजाळ, संगीता दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश घाटोळ व डॉ. गौड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण शेती प्रयोगांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विस्तार अधिकारी रविदास भोयर यांनी केले.तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार प्रत्येकी दोन शेतकरी आणि जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या पीक स्पर्धेतील चार शेतकऱ्यांचा या वेळी सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हास्तरीय पीक स्पर्धा विजेते
- श्रीकृष्ण भांगे (हिंगणा शिकारी, ता. बाळापूर), दीपक थोरात (गोर्धा, ता. तेल्हारा), सीताराम डाखोरे (उमरवाडी, ता. पातूर), आशीष घुंगळ (वरुड वडनेर, ता. तेल्हारा)
तालुकास्तरावरील प्रगतिशील शेतकरी
नारायण पडांगे (कानशिवनी, अकोला), समाधान ठोंबरे (कुंभारी, अकोला), संतोष भास्कर (राहणापूर, अकोट), राजू तराळे (एडलापूर, अकोट), मिथुन काळे (तामशी, बाळापूर), ऋषिकेश पाटील (निमकर्दा, बाळापूर), सुवर्णा गावंडे (शेलू बु., बार्शीटाकळी), प्रमिला ढोरे (महागाव, बार्शीटाकळी), वैभव राऊत (शेंद, मूर्तिजापूर), निजामोद्दीन हाजी सद्रोदिन (ब्रम्ही बु., मूर्तिजापूर), पांडुरंग देवकर (गोंधळवाडी, पातूर), उमेश फुलारी (पातूर), अनिल इंगळे (चितलवाडी, तेल्हारा), यश नराजे (हिंगणी बु., तेल्हारा).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.