Sangli Market Committee : सांगली बाजार समितीचे अंदाजपत्रक १.७८ कोटींचे

Market Committee Update : सांगली बाजार समितीचे २०२२- २३ वर्षाचे अंदाजपत्रक १ कोटी ७८ लाख रुपयांचे तयार करण्यात आले आहे.
Sangli APMC Election News
Sangli APMC Election NewsAgrowon

Market Committee Sangli News : सांगली बाजार समितीचे २०२२- २३ वर्षाचे अंदाजपत्रक १ कोटी ७८ लाख रुपयांचे तयार करण्यात आले आहे. त्यातून सुमारे ३५ लाख रुपयांची तरतूद सभापती केबिन दुरुस्ती व सजावटीसाठी केली आहे. तर मार्केट यार्ड आवारातील रस्ते कामासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर काही महिन्यांपासून समितीवर प्रशासक आहेत. मार्केट यार्डातील रस्त्यांची अवस्था सध्या बिकट आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठे हळद व बेदाण्यासाठीचे मार्केट म्हणून ओळख असलेल्या यार्डातील रस्त्यातील खड्डे व धुळीचा त्रास व्यापारी, कामगार व शेतकऱ्यांना होत आहे.

Sangli APMC Election News
Market Committee Election News : यवतमाळला बाजार समिती सभापतिपदासाठी रस्सीखेच

अगोदरच्या संचालक मंडळाने जागा खरेदी, नवीन कॉम्प्लेक्स बांधकाम यावरच भर दिला. यार्डातील रस्ते, स्वच्छतागृहांची बिकट अवस्था आहे, हे लक्षात घेऊन प्रशासनाने अंदाजपत्रकात ५० लाख रुपये रस्त्याचे डांबरीकरण, पॅचवर्क, मुरूम व खडी यासाठी तरतूद केली आहे.

वसंतदादा पाटील स्मृती भवन हॉलच्या दुरुस्तीसाठी पाच लाख, नंदी मंदिराच्या ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवणे व कंपाउंड वॉलसाठी दोन लाख, बेदाणा सौदे हॉलच्या सभोवती कंपाउंड भिंत वाढवणे व ई नाम अंतर्गत नाका बांधणे यासाठी तीन लाख ५० हजार रुपयांची तरतूद केली आहे. गटार, पाइपलाइन दुरुस्ती, नवीन पाइपलाइन यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये तरतूद केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com