Rojgar Hami Yojana : नगर जिल्ह्यात ‘रोहयो’च्या कामांवर १७ हजार मजूर

Labor Update : दुष्काळी परिस्थिती असल्याने यावर्षी रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. मागील वर्षी ‘रोहयो’वर याच कालावधीत मे महिन्यात जिल्ह्यात ८ हजार ९८९ मजूर होते.
Labor
LaborAgrowon
Published on
Updated on

Nagar News : दुष्काळी परिस्थिती असल्याने यावर्षी रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. मागील वर्षी ‘रोहयो’वर याच कालावधीत मे महिन्यात जिल्ह्यात ८ हजार ९८९ मजूर होते. जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि महसूल यंत्रणेची १ हजार ९७१ कामे सुरू असून यावर्षी १७ हजार १४६ मजूर या कामांवर आहेत.

जिल्ह्यात मागील पावसाळ्यात कमी पाऊस झाल्यामुळे ऑगस्ट २०२३ मध्ये राज्य शासनाने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली होती. खरीप हंगामात पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. यामुळे प्रशासनाने पीकविम्याची २५ टक्के रक्कम अग्रमी देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले.

Labor
Rojgar Hami Yojana : चाळीसगाव तालुक्यात ‘रोहयो’ची १५४३ कामे सुरू

त्यानंतर परतीचा पाऊस होऊन रब्बी हंगामात पिके काही प्रमाणात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, परतीचा पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराश पडली. रब्बी हंगामात शेतीसाठी पाणी नसल्याने शेत मजूरांना ‘रोहयो’शिवाय रोजगाराचा पर्याय नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात गेल्या महिनाभरात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास होता. रोजगारासाठी मजुरांची ‘रोहयो’ला पहिली पंसती आहे. यामुळे आजही ग्रामीण भागात ‘रोहयो’वरील मजुरांची संख्या वाढत आहे. रोजगार हमी योजनेतून घरकुल, सिंचन विहिरी, पाणंद रस्ते, गुरांचे गोठे, रोपवाटिका, वृक्ष संगोपन यासह व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना, शौचालये आदींची कामे सुरू आहेत.

Labor
Rojgar Hami Yojana : मुदत संपूनही ‘रोहयो’चे आराखडे अपूर्ण

‘रोहयो’अंतर्गत जिल्ह्यात गावपातळीवर मजुरांकडून कामांची मागणी प्राप्त होताच तातडीने कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिले आहेत.

‘रोहयो’ची तालुकानिहायक आकडेवारी

तालुका मजूर कामे

जामखेड ८ हजार ८०० ७४२

कर्जत ४५४ ६२

अकोले ४८१ २१२

कोपरगाव १८९ ६५

नगर ३८३ ५५

नेवासे १६५ ३५

पारनेर १ हजार ९२ ७४

पाथर्डी ८९४ १०७

राहाता १५४ ४९

राहुरी २२३ ५८

संगमनेर १ हजार ७६ २०३

शेवगाव २ हजार ५८३ २५७

श्रीगोंदे ६६८ ११७

श्रीरामपूर ८४ २६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com