

Parbhani News : यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात ३१ मेअखेर २८ हजार ५१९ शेतकऱ्यांना २१५ कोटी ३६ लाख (१७.०३ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात सोमवार (ता. १२) अखेरपर्यंत २० हजार ४६८ शेतकऱ्यांना १४५ कोटी ४२ लाख ३७ हजार रुपये (१६.६२ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
या दोन जिल्ह्यांत पीककर्ज वाटपात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आघाडी घेतली आहे. त्यानंतर जिल्हा सहकारी बँक द्वितीय क्रमांकावर आहे. राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जवाटप संथ गतीने सुरू आहे.
परभणी जिल्ह्यात यंदा खरीप हंगामामध्ये १ हजार २६४ कोटी ४३ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांना (व्यापारी बँका) एकूण ८१० कोटी २५ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १९४ कोटी ७४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १५४ कोटी ३१ लाख रुपये, खासगी बँकांना १०५ कोटी १३ लाख रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे.
ता.३१ मे अखेर राष्ट्रीयीकृत बँकांना ४ हजार ४ शेतकऱ्यांना ४५ कोटी ७६ लाख रुपये (५.६५ टक्के) पीककर्ज वाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ८ हजार ९७३ शेतकऱ्यांना ८८ कोटी १७ लाख रुपये (४५.२८ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १५ हजार १९१ शेतकऱ्यांना ७६ कोटी ७ लाख (४९.३० टक्के), खासगी बँकांनी ३५१ शेतकऱ्यांना ५ कोटी ३६ लाख रुपये (५.१० टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात १६.६२ टक्के वाटप
हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरिपात ८७४ कोटी ९९ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांना (व्यापारी बँका) एकूण ५५७ कोटी १ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १७५ कोटी ८ लाख रुपये, जिल्हा बँकेला १४२ कोटी ९० लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.
सोमवार (ता. १२) अखेर व्यापारी बँकांनी ४ हजार ९९ शेतकऱ्यांना ४३ कोटी ५० लाख २६ हजार रुपये (७.८१ टक्के) पीककर्ज वाटप केले. ग्रामीण बँकेने ७ हजार ३२४ शेतकऱ्यांना ६५ कोटी ३३ लाख रुपये (३७.३१ टक्के), जिल्हा बँकेने ९ हजार ४५ शेतकऱ्यांना ३६ कोटी ५९ लाख ११ हजार रुपये (२५.६१ टक्के) कर्ज वाटप केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.