
Nandurbar Election News : तळोदा तालुक्यातील सहकारी संस्था तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही निवडणूकदेखील कृषी बाजार समितीसारखी बिनविरोध झाली आहे. माघार घेण्याच्या दिवशी २५ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न करावे लागले.
निवडणुकीसाठी ८ मे रोजी २५ उमेदवारांनी माघार घेतली व १७ जागांसाठी १७ नामनिर्देशनपत्रे शिल्लक राहिल्याने खरेदी-विक्री संघ बिनविरोध करण्यात नेत्यांना यश आले.
निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून आमदार राजेश पाडवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, डॉ. शशिकांत वाणी, गोविंद पुरुषोत्तम पाटील यांनी प्रयत्न करून सर्वपक्षीय संचालक निवडून आणले आहेत.
जितेंद्र सूर्यवंशी, योगेश मराठे, सुरेश माळी, सतीश वळवी, जितेंद्र दुबे, अनुप उदासी, कैलास चौधरी, आनंद सोनार, सूरज माळी, नारायण ठाकरे, प्रकाश वळवी, विठ्ठल बागले उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका उपनिबंधक सचिन खैरनार व सहाय्यक म्हणून मंगलसिंग पावरा व संघाचे व्यवस्थापक योगेश चौधरी यांनी काम पाहिले.
व्यक्तिशः सभासद गटातून पुरुषोत्तम रामदास चव्हाण, संजय श्रीपत पटेल, नितीन सखाराम पाटील, सुरेश दत्तात्रेय पाटील, कांतिलाल राजाराम भापकर, चंदू हरी भोई, अरुण नथ्थू मगरे, विलास कृष्णा लोखंडे, तर सहकारी संस्था सभासद गटातून संजीव रमेश चौधरी, गोविंद पुरुषोत्तम पाटील, जितेंद्र रघुनाथ पाटील, सुभाष रामदास पाटील अनुसूचित जाती-जमाती गटातून पूनमचंद ओंकारचंद भिल, महिला राखीव गटातून आशाबाई पटेल, सुरेखा सागर व इतर मागासवर्गीय गटातून भरत पाटील, भटक्या विमुक्त मागासवर्ग गटातून अविनाश भारती यांची बिनविरोध निवड झाली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.