Rain Update : सांगली जिल्ह्यात जूनमध्ये यंदा १५६ टक्के पाऊस

Rain Forecast : गतवर्षी जून महिन्यात २७ टक्के इतका पाऊस झाला होता. सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला होता. मात्र, जिल्ह्यात यंदा जूनमध्ये वेळेवर पावसाने हजेरी लावली.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Sangli News : गतवर्षी जून महिन्यात २७ टक्के इतका पाऊस झाला होता. सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला होता. मात्र, जिल्ह्यात यंदा जूनमध्ये वेळेवर पावसाने हजेरी लावली. जूनमधील २१ पैकी सरासरी १३ दिवस पाऊस झाला असून २०१ मिमी म्हणजे १५६ टक्के इतका पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेत १६८ मिमीने पाऊस जास्त झाला असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात गतवर्षी उन्हाळी आणि अवकाळी पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी पूर्वमोसमी आणि मॉन्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करत होता. गेल्या वर्षी जूनमध्ये उशिरा पाऊस सुरू झाला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती.

Rain Update
Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश मंडलांत शून्य मिमी पावसाची नोंद झाली. एक ते दोन मिमी इतका पाऊस झाला होता. जूनमधील ३० पैकी ७ दिवस पाऊस झाला. परंतु हा पाऊस पेरणीसाठी उपयुक्त नव्हता. त्यामुळे जूनमध्ये सर्वसाधारण पाऊस १२९ मिमी इतका आहे. सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत ३६ मिमी म्हणजे २७ टक्के पाऊस झाला.

Rain Update
Monsoon Rain : पुढील आठवडाभर पाऊस कसा राहणार ? मराठवाडा, विदर्भात पावसाचे प्रमाण कसे राहू शकते?

यावर्षी जूनच्या पहिल्या तारखेपासूनच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्व दूर मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाले, ओढ्यांना पाणी आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू केली. यावर्षी जून महिन्यातील २१ पैकी १३ दिवस जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वसाधारण पावसापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तेरा दिवसांत २०१ मिमी म्हणजे १५६ टक्के पाऊस झाला. जत, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यांतही दमदार पाऊस झाला.

तालुकानिहाय तुलनात्मक पाऊस (मिमी)

तालुका जून २०२३ जून २०२४

मिरज ३६.८ १९८.१

जत ३७.९ २१२.३

खानापूर-विटा ३१.१ १७८.७

वाळवा-इस्लामपूर २९.० २१९.०

तासगाव ४४.४ २१८.८

शिराळा ६४.४ १५३.९

आटपाडी २६.९ १९१.६

कवठेमहांकाळ २४.१ २३३.४

पलूस २२.५ १७२.८

कडेगाव ३५.४ २०३.५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com