Maharashtra Government Scheme : सोलापुरात २५ ठिकाणांहून काढला १५० टीसीएम गाळ

Galmukta Dharan : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेतून सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
Solapur News
Solapur NewsAgrowon
Published on
Updated on

Solapur News : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेतून सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जिल्ह्यातील विविध भागांतील ९९ ठिकाणे गाळ काढण्यासाठी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी २५ ठिकाणांहून प्रत्यक्षात गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे.

त्यातून आतापर्यंत १.५ लक्ष (१५० टीसीएम) घनमीटर गाळ उपसला आहे. तर ७५ हेक्टर क्षेत्रावर तो टाकण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्वांत मोठा मानला जात असलेल्या एकरूख तलावामध्ये गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. या तलावातून दिवस रात्र गाळ काढला जात असून सुमारे दोन पोकलन, चार जेसीबी, २० ट्रॅक्टर, २५ हायवाच्या माध्यमातून दिवसाला साडेतीन हजार घनमीटर गाळ उपसा केला जातोय.

एकरुख तलावातील या गाळ काढण्यास सुरू असलेल्या ठिकाणाला आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार सैफन नदाफ, जलसंधारण विभागाचे उपअभियंता व्ही. एन. होनमुटे, प्रल्हाद कांबळे, यतीन शहा यांनी भेट देत सर्वत्र पाहणी केली.

Solapur News
Galyukat Shiwar Yojana : ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’मुळे गावे समृद्ध होणार

या वेळी आमदार देशमुख म्हणाले, की शेतकऱ्यांच्या नापीक जमिनी सुपीक करणारी सरकारची ही महत्त्वांकांक्षी योजना आहे, सध्या पावसाळ्याच्या तोंडावर याचे काम सुरू झाले असले, तरी प्रतिसाद चांगला आहे, शिवाय वेगाने काम सुरू आहे. त्यामुळे बऱ्यापैकी काम होईल.

पण पावसाळ्यात काम करता येणार नाही. त्यासाठी पावसाळ्यातसुद्धा पाण्याखालील गाळ काढता यावा, असे तंत्रज्ञान शोधण्याची गरज आहे, यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत, असेही ते म्हणाले.

वाढीव अनुदानाचा निर्णय शासनाचा

जिल्हाधिकारी ठोंबरे म्हणाले, की शासनाच्या धोरणानुसार विधवा, माजी सैनिक, अल्पभूधारक यांना हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये गाळ वाहून नेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. काही शेतकऱ्यांची मागणीही आमच्याकडे होते आहे.

तर काहींनी यासंबंधीचे अनुदान वाढवून देण्याची मागणी केली आहे. परंतु शासनाच्या धोरणानुसार योजना राबवली जात आहे. शासनाच्या निर्णयानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com