Amravati Crop Insurance : अमरावती जिल्ह्यातून विमा भरपाईसाठी दीड लाख पूर्वसूचना

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : विमा कंपन्यांचा भरपाईच्या अनुषंगाने यापूर्वीचा अनुभव पाहता शेतकऱ्यांचा एक रुपया विमा हप्ता असतानाही सुरुवातीला योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
Farmer
FarmerAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा 

Amravati News : एक रुपयात पीकविमा योजना राबविल्यानंतर त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसादही मिळाला. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत तब्बल २९ लाखांवर शेतकऱ्यांनी आपले क्षेत्र संरक्षित केले आहे. अशातच अतिवृष्टी व संततधार पावसामुळे गेल्या आठवड्यात नुकसान झाल्याने सहा जिल्ह्यांमधून तब्बल दीड लाखांवर शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे भरपाईच्या अनुषंगाने दावे दाखल केले आहेत. 

विमा कंपन्यांचा भरपाईच्या अनुषंगाने यापूर्वीचा अनुभव पाहता शेतकऱ्यांचा एक रुपया विमा हप्ता असतानाही सुरुवातीला योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी कृषी विभागाकडून विमा योजनेची व्यापक जागृती मोहीम हाती घेण्यात आली. त्यानंतर अकोला जिल्ह्यात ४ लाख ३३ हजार ७५, अमरावती लाख ५ हजार ६९३, बुलडाणा ७ लाख २५ हजार २०७, वाशीम ४ लाख १८ हजार ६४९, यवतमाळ ८ लाख ३३ हजार ८६० या प्रमाणे शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदविला. अमरावती विभागात एकूण विमाधारक शेतकऱ्यांची संख्या २९ लाख १२ हजार १७८ आहे. २४ लाख ३६ हजार ३५० हेक्‍टर क्षेत्र या माध्यमातून संरक्षित करण्यात आले. 

Farmer
Nanded Crop Insurance : नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत ‘रेकॉर्ड ब्रेक’ सहभाग

दरम्यान अमरावती विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, संततधार पाऊस झाला. नदी-नाल्यांच्या काठावरील जमीन खरडून गेली. परिणामी शेतकऱ्यांनी नियमानुसार ७२ तासांत भरपाईच्या अनुषंगाने दावे दाखल केले आहेत. यामध्ये सर्वाधिक बाधीत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातून ९० हजार २७३, बुलडाणा २४ हजार ५३३, वाशीम १३ हजार २७८, अमरावती १० हजार ७३८ तर अकोला जिल्ह्यातून १० हजार ६०६ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. कंपनीस्तरावर पंचनाम्याची प्रक्रियादेखील राबविली जात असल्याने शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याची अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. 

विमा प्रतिनिधीकडून मारहाण झाल्याचा आरोप

यवतमाळच्या महागाव तालुक्‍यात एका विमा प्रतिनिधीने सर्व्हेक्षण, पंचनाम्याचे काम करीत असताना शेतकऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी तक्रार देण्यात आली नाही. परिणामी कोणतीच कारवाई झाली नसल्याचे सांगीतले जाते. आपल्या शेतातून इतर शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या प्रकाराला आक्षेप घेतल्याने झालेल्या वादानंतर ही मारहाण झाल्याचा आरोप आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com