
Nashik News : येवला बाजार समितीची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. त्यामुळे आमदार छगन भुजबळ आणि शिवसेनेचे नेते आमदार नरेंद्र दराडे यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.
भुजबळ यांच्या आरोपावर आमदार दराडे म्हणाले, की मी भुजबळ यांना सांगू इच्छितो की आम्ही जिल्हा बँक बुडवली नाही. आम्ही ‘आर्मस्ट्राँग’ कंपनीसाठी भुजबळ यांना १५ कोटी रुपये कर्ज दिले होते. आजपर्यंत तुम्ही एक रुपयादेखील परतफेड केलेली नाही. ४० कोटींची तुमच्यावर थकबाकी आहे, असा पलटवार आमदार दराडे यांनी भुजबळांवर केला.
येवला बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी सभा घेतली. त्यात त्यांनी दराडे यांच्यावर आरोप केले. शेतकरी विकास पॅनेल आणि समर्थ पॅनेल यामध्ये लढत आहे. त्या पॅनेल व प्रचाराऐवजी भुजबळ यांनी जिल्हा बँक दराडे बंधुंनी बुडवली, असे विधान केले.
त्यावर दराडे म्हणाले, की तुमच्यासारख्या बलाढ्य लोकांनी जिल्हा बँकेला बुडवले आहे. गरीब, शेतकऱ्यांचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. मी ओरिजनल शिवसैनिक आहे.
उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. माझ्या शेपटावर पाय देऊ नका. उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिला.
ते म्हणाले, की तुम्ही मला ‘म्हाडा’चा विभागीय अध्यक्ष गेले. त्यात काहीही उपकार केले नाहीत. मी दहा, पंधरा वर्षे तुमच्याबरोबर होतो. इतर लबाड व लुच्चे लोकांसारखे कधी एक रुपया तुमचा मी वापरला नाही. आज तुमच्याकडे विक्री करणारे लोक आले आहेत.
भुजबळ गटाकडून दराडेंवर टीका
जिल्हा बँक आणि येवल्यातील सहकारी संस्था कुणी बुडविल्या हे येवल्यापासून ते नाशिकपर्यंत सर्वजण चांगलेच जाणून आहेत.
दराडे बंधूंनी विविध बँका आणि सहकारी संस्था मोडकळीस काढण्यात किती योगदान दिल हे सर्वश्रुत असून ‘जनता सब जाणती है’ अशी टीका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी दराडे यांच्यावर केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.