Swabhimani Shetkari Saghtana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १२ पदाधिकाऱ्यांचा दे धक्का, महायुतीला पाठिंबा; राजू शेट्टी यांचे स्पष्टीकरण

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
Swabhimani Shetkari Saghtana
Swabhimani Shetkari SaghtanaAgrowon
Published on
Updated on

Pune News : ऐन विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठी गळती लागली असून संघटनेच्या १२ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टींची साथ सोडली आहे. आताही तिसऱ्या आघाडीचा पर्याय आम्हाला अमान्य असल्याचं परिपत्रक काढत या नाराज नेत्यांनी काढले आहे. तर स्थापन केलेल्या तिसऱ्या आघाडीचा पर्याय आम्हाला अमान्य असल्याचं परिपत्रक काढत नेत्यांनी नाराज व्यक्त केली आहे. यावरून या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केल्याचे स्पष्टीकरण संघटनेनं दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीला तिसरा पर्यात देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी तिसरी आघाडीची स्थापन केली. यावेळी मोठा गाजावाजा झाला. मात्र आता तिसऱ्या आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गळती लागली असून पहिल्या फळीतील डझनभर नेत्यांनी नाराजी व्यक्त करत साथ सोडली आहे.

Swabhimani Shetkari Saghtana
Swabhimani Shetkari Sanghtana : अतिवृष्टी अनुदान, पीकविमा द्या, अन्यथा मतदानावर बहिष्कार

शेतकऱ्यांबाबत सहकारात्मक निर्णय घेत असल्याने आपण महायुतीला आम्ही जाहीर पाठिंबा देत असल्याचे परिपत्रक सावकार मदनाईक, मिलिंद साखरपे, जनार्दन पाटील, पायगोंडा पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काढले आहे. मात्र, चळवळीचे काम पूर्ववत राहील, असा खुलासाही पदाधिकाऱ्यांनी केला यावेळी केला आहे.

आमची पिछेहाट का?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पहिल्या फळितील नेत्यांनी काढलेल्या पत्रकातं, राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडी करून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा घेतलेला निर्णय पदाधिकाऱ्यांना मान्य नाही. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत यापेक्षाही सक्षम प्रयोग 'रिडालोस'चा अयशस्वी ठरला. गेल्या २५ वर्षात संघटनेतील अनेकांनी लाट्या काठ्या खाल्ल्या. जेलमध्ये गेले. मात्र राजकारणात आमची पिछेहाट का झाली? याचे चिंतन व्हायला पाहिजे होते. महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन सक्षम पर्याय आज निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही महायुतीला सहकार्य करण्याची भूमिका घेत असल्याचे म्हटले आहे.

Swabhimani Shetkari Saghtana
Swabhimani Shetkari Sanghtana Protest : परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

तसेच या पत्रकात महायुतीरने साडेसात एचपीपर्यंतच्या मोटर पंपाना दिलेली वीजमाफी, २०१९ ते २०२५ पर्यंत पाणीपुरवठा संस्थांना दिलेली वीज सवलत, उच्च दाबासाठी १.१६ पैसे आणि लघुदाबासाठी प्रति युनिट एक रुपये जाहीर करून १२५० ते १३०० पाणीपुरवठा संस्था पश्चिम महाराष्ट्रात आहेत. उर्वरित महाराष्ट्रात ६०० ते ७०० संस्था आहेत. महाराष्ट्रातील दहा लाख शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होणार आहे.

आता महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना ४५ हजार गावांना पाणंद रस्ते, वीज बिलात ३० टक्के कपात करून सौर ऊर्जा योजनेवर दिलेला भर, शिवाय साखरेचा हमीभाव ३१०० रुपये होता तो किमान ४ हजार रुपये व्हायला हवा असे अनेक शेतकरी हिताचे निर्णय त्यांनी घेतल्यामुळे आम्ही महायुतीला सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

Swabhimani Shetkari Saghtana
Swabhimani Shetkari Sanghatana : हातकणंगलेसह ६ जागांवर स्वाभिमानी उमेदवार देणार : राजू शेट्टी

महायुतीस पाठिंबा देणे म्हणजे हास्यास्पद

दरम्यान या पत्रकावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रधान सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी परिपत्रक काढत ज्यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांना आधीच संघटनेतून पदमुक्त करण्यात आले आहे. यामुळे जालिंदर पाटील, जनार्दन पाटील यांच्याही ज्यांनी पत्रकावर सह्या केल्या त्यांनी महायुतीस पाठिंबा देणे म्हणजे हास्यास्पद आहे.

तसेच सावकर मादनाईक यांच्यासह उर्वरीत पदाधिकार्यावरील कारवाईचा निर्णय राज्यकार्यकारिणीत लवकरच होईल. मादनाईक यांच्यासह तीन सदस्यांनी महायुतीस दिलेल्या पाठिंब्याच्या भुमिकेचा स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाचा कोणताही व कसलाही संबंध नाही. त्यांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे. स्वाभिमानी पक्ष हा परिवर्तन महाशक्ती आघाडीमध्ये सामील असल्याचे पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com