Crop Damage Compensation : अतिवृष्टीचे १०२ कोटी रखडले; नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

Farmer Compensation : गेल्या खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीची कोट्यवधींची मदत अद्याप शासनाकडे रखडलेली आहे. ही रक्कम तब्बल १०२ कोटी रुपयांची असून शासनाकडून निधी कधी दिला जातो याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Crop Damage Compensation
Crop Damage CompensationAgrowon
Published on
Updated on

Akola News : अकोला ः गेल्या खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीची कोट्यवधींची मदत अद्याप शासनाकडे रखडलेली आहे. ही रक्कम तब्बल १०२ कोटी रुपयांची असून शासनाकडून निधी कधी दिला जातो याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

खरीप हंगामात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ५७ हजार ७५८.५ हेक्टर क्षेत्राची हानी झाली होती. संबंधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ७९ कोटी ४४ लाख ३५ हजार ९०८ कोटी रुपयांचा प्रस्ताव २७ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठवण्यात आला. त्याबरोबरच ऑक्टोबरमध्ये मुसळधार पावसामुळे तेल्हारा तालुक्यातील १४ हजार ४९३.८७ हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले होते.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : अतिवृष्टीचे ३९५ कोटी रुपये ‘महाआयटी’ पोर्टलवर अपलोड

यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २२ कोटी ७३ लाख ८६ हजार २९० रुपयांच्या मदतीचा संयुक्त प्रस्ताव शासनाकडे ३० डिसेंबर २०२४ रोजी देण्यात आला. दरम्यान, आता रब्बी हंगाम संपण्याच्या मार्गावर असून लवकरच आगामी खरीप हंगामाची तयारी शेतकरी करणार आहेत. त्या अनुषंगाने शासनाकडे रखडलेल्या तीन महिन्यांतील अतिवृष्टीचे तब्बल १०२ कोटी शेतकऱ्यांना मिळावेत, अशी मागणी केली जात आहे.

Crop Damage Compensation
Farmer Compensation : नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अकोट, अकोला, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर तालुक्यातील २२७ गावांतील ५६ हजार ९८४.५३ हेक्टर क्षेत्र बाधित झालेले होते. अकोट तालुक्यातील ७७ हेक्टरवर केळी, ८२ हेक्टरवर पानपिंपरी असे एकूण १५९ हेक्टर व लिंबू आणि सत्र्यांचे १८९.५८ हेक्टर

क्षेत्र बाधित आहे. पातूर तालुक्यातील ३७ हेक्टवर लिंबू व संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.
ऑक्टोबरमध्ये जोरदार पावसाचा तेल्हारा तालुक्यातील पिकांना फटका बसला होता. यामध्ये चार हजार ९८० हेक्टरवरील कापूस तर सहा हजार ५९५ हेक्टरवर सोयाबीन तर ८५३ हेक्टरवरील तूर व १३ हेक्टरवरील ज्वारी, याशिवाय १६४.८७ हेक्टरवरील भाजीपाला, ४८१ हेक्टरवरील केळी, ९४ हेक्टरवरील पपई व १५५ हेक्टरवरील इतर पीक,१९० हेक्टरवरील लिंबू, ६१० हेक्टरवरील संत्रा व १६ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे. एकूणच शेतकऱ्यांना या मदतीची अद्याप अपेक्षा लागलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com