Anandacha Shidha : गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीला १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

शिधा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून देण्यात येणार आहे.
Anandacha Shidha
Anandacha Shidha Agrowon

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बुधवारी (ता.२२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली.

शिधा पत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून देण्यात येणार आहे.

१ महिन्यासाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात शिधा वाटप केला जाणार आहे.

तसेच ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा देण्यात येणार आहे.

राज्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी कार्डधारकांना शिधा वाटप करण्यात येणार आहे.

दरम्यान, दिवाळीत राज्यातील १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आल्याचा दावाही राज्य सरकारने केला आहे.

आनंदाचा शिधावर खर्च किती?

आनंदाचा शिधा वाटपासाठी आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Anandacha Shidha
Soybean Bajarbhav : सोयाबीनच्या भावात आज, २१ फेब्रुवारीला कोणत्या बाजारांमध्ये झाली सुधारणा?

२०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रतिसंच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात देण्यात आल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com