Solar Electricity : प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना १०० टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा

Solar Energy : प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना १०० टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची योजना महावितरणने तयार केली असून निवड झालेल्या गावांना येत्या दोन महिन्यांत हा वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
Solar Project
Solar ProjectAgrowon
Published on
Updated on

Akola News : प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना १०० टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची योजना महावितरणने तयार केली असून निवड झालेल्या गावांना येत्या दोन महिन्यांत हा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या गावांत पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना तीन किलोवॉटपर्यंत ७८ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

तसेच पाणीपुरवठा व दिवाबत्ती योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी शासकीय निधीतून पैसे उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच या गावातील सर्व वाणिज्यिक व औद्यगिक ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरण आवाहन करणार आहे.

Solar Project
Solar Project : पश्चिम महाराष्ट्रात उभारणार ९०० मेगावॅट चा सौरऊर्जा प्रकल्प

पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत निवासी घरगुती ग्राहकांसाठी प्रतिकिलोवॉट ३० हजार रुपये अनुदान दोन किलोवॉटपर्यंत मिळते. तीन किलोवॉटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार अनुदान मिळते.

तीन किलोवॉटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आदर्शगाव मान्याचीवाडी गावाला लवकरच १०० टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. हे गाव लवकरच सौरग्राम म्हणून नावलौकीकाला येणार आहे.

Solar Project
Solar Electricity : सांगलीतील झुरेवाडी, निमसोडला सौरऊर्जेद्वारे १०० टक्के वीजपुरवठा

शंभर टक्के सौर ऊर्जेसाठी निवडलेली गावे

जालना जिल्हा (पातोडा, दारेगाव), बीड (नानदी, आनंदवाडी), लातूर (नवीन आदर्श कॉलनी, मयूरबन सोसायटी), हिंगोली (सुलदळी गोरे, दातेगाव), नांदेड (हाडोळी,दवणगिर), परभणी (आंबेटाकळी, मुरूमखेडा), पेण (पाडवी पठार, वडवल), वाशी मंडळ (नेरेपाडा गाव, सिवानसाई गाव), धुळे (कलगाव, नाथे), जळगाव (निंबोल, पातोंडी), नंदुरबार (मोहिदा, ब्राह्मणपुरी), कल्याण मंडळ-१ (शिरवली कुंभारली), कल्याण मंडळ-२ (गोलभान, मोहोप), पालघर (अक्करपट्टी, कोलगाव), वसई मंडळ (शिवनेरी, निर्वाण), रत्नागिरी (फुरुस, असूर्डे), नगर (पारेगाव, हिवरे बाजार), मालेगाव मंडळ (वाके, निंबोळा), नाशिक मंडळ (कोनांबे, दारणा सांगवी), अकोला (सौंदाळा, सांगळूद),

बुलडाणा (बजरंग नगर-सागवान विभाग, सावजी लेआउट, सुटाळा खुर्द), वाशीम (झाकलवाडी, पारवा), अमरावती (नवाथे,काठोरा), चंद्रपूर (सोमनाथ, आनंदवन), गडचिरोली (कोंढाणा तुंबडी मेंढा), भंडारा (भोसा, दहेगाव), नागपूर ग्रामीण मंडळ (चिखली, सिंधी), नागपूर शहर मंडळ (किरमीती भारकस, कॉस्मोपॉलिटन), वर्धा (नागझरी, नेरी मिर्जापुर), बारामती मंडळ (वांजरवाडी कुंभारकर वस्ती, गणेश रोड नानगाव), सातारा (मान्याची वाडी), सोलापूर (चिंचणी, औज), कोल्हापूर (शेळकेवाडी, पिराचीवाडी), सांगली (झुरेवाडी निमसोड), गणेशखिंड मंडळ (शिवतीर्थ नगर, सेक्टर २५ निगडी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com