ई-पीक पाहणीद्वारे १ कोटीहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांची नोंदणी आता शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक पाहणी होईल१०० टक्के पीक पाहणी पूर्ण करण्याचा निर्णय.Peek Pahani : ई-पीक पाहणीद्वारे १ कोटीहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांची नोंदणी झाली आहे. अद्याप सुमारे ४५ लाख हेक्टरवरील पीक पाहणी होणे बाकी आहे. दरम्यान, १०० टक्के पीक पाहणी होणार असून १ ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान प्रत्येक शेतावरील पीक पाहणी सहाय्यकामार्फत पूर्ण करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. .आता प्रत्यक्ष पीक पाहणीराज्य आपत्कालीन स्थितीतून जात असल्याने खरीप हंगाम २०२५ साठी पीक पाहणी करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. १०० टक्के पीक पाहणी करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे. त्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत पीक पाहणी होईल. आतापर्यंत पीक पाहणी ऑनलाईन करत होतो. आता शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक पाहणी होईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून जी काही मदत येईल ती दिली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. .E-Peek Pahani : कापूस, सोयाबीनची ई-पीक पाहणी गरजेची.ई- पीक पाहणीची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली. आता उर्वरित एका महिन्यात सहाय्यकांच्याद्वारे उर्वरित सर्व शेतांवरील पीक पाहणी करणे आवश्यक आहे. जे शेतकरी गावातच आहेत. पण त्यांची पीक पाहणी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावरील पीक पाहणी सहाय्यकामार्फत करण्यात येत असल्याबाबत अवगत करावे. कोणत्याही परिस्थितीत सर्व गावातील शेतांची पीक पाहणी पूर्ण करावी. राज्य ज्या आपत्कालीन परिस्थितीतून जात आहे त्यासाठी पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये शंभर टक्के पीक पाहणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. .E-Peek Pahani : ‘ई-पीकपाहणी’चा खोळंबा.शेतजमिनीवरील पिकाची अचूक नोंद शासन दप्तरी होण्यासाठी ई- पीक पाहणी केली जाते. याद्वारे 7/12 वरील कोणत्या गटात, कोणते पीक घेतले आहे याची नोंद घेतली जाते. दरम्यान, ई-पीक पाहणी नोंद करताना शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊनची समस्या जाणवली. .पीक पाहणी का गरजेची आहे?पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी पीक पाहणी गरजेची आहे. पीक विम्यासाठी पीक पाहणीत नोंदवलेले पीक गृहित धरले जाते. तसेच अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची नुकसान भरपाई देण्यासाठी पीक पाहणी आवश्यक आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.