Turmeric Processing : विडालय टरमरीक प्रोसेसींग क्‍लस्टरसाठी दहा कोटींची तरतूद

Vidalaya Turmeric Processing Cluster : परंपरागत हळद लागवडीचा पॅटर्न जपणाऱ्या विडूळ परिसरात विडालय टरमरीक प्रोसेसींग क्‍लस्टरला मंजुरी देण्यात आली आहे.
Turmeric Processing
Turmeric ProcessingAgrowon

Yavatmal News : परंपरागत हळद लागवडीचा पॅटर्न जपणाऱ्या विडूळ परिसरात विडालय टरमरीक प्रोसेसींग क्‍लस्टरला मंजुरी देण्यात आली आहे. या माध्यमातून हळद काढणीपश्‍चात शास्त्रोक्‍त प्रक्रियेवर भर दिला जाणार आहे. तब्बल दहा कोटी रुपयांची तरतूद या प्रकल्पाकरिता करण्यात आली असून जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे.

विडालय टरमरीक प्रोसेसींग क्‍लस्टरचे रामेश्‍वर बिच्चेवार यांनी या संदर्भाने माहिती दिली. त्यानुसार, हळदीमध्ये काढणी, उकळणे आणि पॉलिशींग असा सर्व प्रक्रिया सध्या मॅन्यूअली होतात.

पूर्वी कढईत हळकुंड टाकत ती उकळली जात होती. त्यानंतर देश आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर हळद उकळणी यंत्रांचे पीक आले. ट्रॅक्‍टरवर त्याची बांधणी केली असली तरी या बॉयलरमध्ये देखील जळतन म्हणून लाकडाचाच वापर होतो.

Turmeric Processing
POCRA Scheme : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ‘पोकरा’त ६ हजार कोटींची तरतूद

ठरावीक वेळेनंतर विशिष्ट सुगंध आला की हळद उकळली असे मानले जाते. परंतु हळदीपासून उत्तम दर्जाची पावडर मिळावी याकरिता त्याचे उकळण्याचे परिमाण निश्‍चित करण्यात आले आहेत. अशाप्रकारे तांत्रिकरित्या उकळणारी सयंत्र विदेशात आहेत. परंतु आपल्याकडे सुगंधावरून हळद उकळल्याचे मानले जाते.

त्यामागे कोणतेही तंत्र किंवा विज्ञान नाही. त्याचा फटका आंतरराष्ट्रीय बाजारात हळद पावडर पाठविल्यानंतर बसतो. त्यासोबतच मॉईश्‍चर कंटेट ८ पर्यंत आणतो. ९ पेक्षा अधिक ओलावा असल्यास बुरशी वाढते. त्यामुळे देखील हळद पावडरला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी राहत नाही.

अशाप्रकारची अनेक कारणे भारतीय हळदीला नाकारण्याची आहेत. या पूर्वापार चालत आलेल्या प्रथांना ब्रेक लागावा आणि भारतीय हळदीला देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी याकरिता क्‍लस्टरच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे.

ओल्या हळदीची होणार २४ तासांत भुकटी
जिल्हा उद्योग केंद्राने दहा कोटी रुपयांच्या या क्‍लस्टरला मान्यता दिली आहे. अवघ्या २४ तासांत ओल्या हळदीचे थेट भुकटीत रूपांतर करण्याचा हेतूही यातून साधला जाणार आहे, तशी खास यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. प्रशासकीयस्तरावर कागदोपत्री कारवाई पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प पुढे जाईल, असेही रामेश्‍वर बिच्चेवार यांनी सांगितले.

विडालय टरमरीक प्रोसेसींग क्‍लस्टरला मान्यता मिळाली आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे तत्कालीन व्यवस्थापक नीलेश निकम यांचे त्याकरिता सहकार्य मिळाले आहे. सध्या जिल्हा उद्योग केंद्राचे महाअधीक्षक श्रीनिवास चव्हाण तसेच व्यवस्थापक श्री. भारती हे आहेत. त्यांचाही पाठपुरावा या क्‍लस्टकरीता उपयोगी ठरत आहे.

- रामेश्‍वर बिच्चेवार,
समन्वयक, विडालय टरमरीक प्रोसेसींग क्‍लस्टर, विडूळ, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com