Chana Bajarbhav: हरभरा बाजारात संमिश्र स्थिती

देशभरात हरभऱ्याला आठवड्यात 4 हजार 700 ते 5 हजार 100 रुपये दर मिळाला. चालू आठवड्यात बाजार समित्या सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लगेच आवकेचा दबाव निर्माण करु नये.
Chana Market
Chana Market Agrowon

पुणेः मागील आठवड्यात मार्च एन्डमुळे अनेक बाजारांतील(Agriculture Market) व्यवहार बंद होते. त्यामुळे हरभरा (Gram) बाजाराची स्थिती राज्यनिहाय वेगळी होती. महाराष्ट्रात काही बाजारांत दर सुधारले होते, तर मध्य प्रदेशात मात्र दर नरमले होते. देशभरात (Country0 हरभऱ्याला आठवड्यात 4 हजार 700 ते 5 हजार 100 रुपये दर मिळाला. चालू आठवड्यात बाजार समित्या सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांनी (Farmer) लगेच आवकेचा दबाव निर्माण करु नये, असे आवाहन जाणकारांनी केले.

देशातील हरभरा काढणी जोमात सुरु आहे. उन्हाचा चटका अधिक असल्याने पीक लवकर काढणीला येत आहे. बाजारातही (Market) हरभरा आवक वाढत आहे. देशात काही बाजारांत हरभऱ्याला मागणी चांगली राहत आहे. तर काही बाजारात मागणी सामान्य आहे. त्यामुळे हरभरा दर कमी अधिक राहिले. दुसरीकडे नाफेडचीही खरेदी सुरु आहे. नाफेडने तीन राज्यांत आत्तापर्यंत 3 लाख 58 हजार टन हरभरा (Chana) खऱेदी कला. तर मध्य प्रदेशसह इतर राज्यांतही नाफेडने खरेदी सुरु केली. त्यामुळे हमीभावाने खरेदी वाढण्याचा अंदाज आहे. नाफेडने गुजरातमध्ये सर्वाधिक 1 लाख 88 हजार टन हरभरा खरेदी केला. तर महाराष्ट्रात 1 लाख 37 हजार टन हरभरा शेतकऱ्यांनी नाफेडला (NAFED) विकला. तसेच कर्नाटकातही खरेदी 33 हजार टनांवर पोचली.

Chana Market
Chana Bhav : शेतकऱ्यांनी हमीभावानेच हरभरा विकावा

मागील आठवड्यात मार्च एन्डमुळे बऱ्याच बाजार (Market) समित्या बंद होत्या. बाजारात आवकही कमी राहिली. तर उद्योगाची मागणी चांगली राहिली. त्यामुळे हरभरा दरात 50 ते 100 रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. मागील आठवड्यात लातूर बाजारात सरासरी 4 हजार 700 रुपये ते 4 हजार 900 रुपयाने हरभऱ्याचे व्यवहार झाले. अकोला बाजार (Akola Market) समितीत 4 हजार 850 ते 5 हजार 900 रुपये दर मिळाला. तर जळगाव येथील बाजारात 5 हजार रुपयाने हरभरा विकला गेला. राज्यात 70 टक्क्यांपेक्षा अधिक हरभरा काढणी झाली आहे. पुढील काळात बाजारातील आवक वाढणार आहे.

मध्य प्रदेशात मात्र मागील आठवड्यात दर काहीसे नरमले. येथील बहुतेक बाजार समित्या मार्च एन्डमुळे बंद होत्या. त्यातच मागणीही सामान्य होती. त्यामुळे दर 50 रुपयांपर्यंत नरमले होेते. असे असले तरी इंदोर बाजारात (indore Market) 5 हजार 100 रुपयाने हरभऱ्याचे व्यवहार झाले. तर कटनी येथे 5 हजार ते 5 हजार 100 रुपये सरासरी दर मिळाला. तर राजस्थानधील बाजारांत दर 75 रुपयांवर्यंत सुधारले. राजस्थानमधील बिकानेर आणि जयपूर बाजारात हरभार 5 हजार 100 रुपयाने विकला गेला. किशनगड येथे 4 हजार 700 रुपये दर मिळाला.

हरभरा (Gram) काढणी जोमात सुरु आहे. त्यातच मार्च एन्डमुळे अनेक बाजारांतील व्यवहार बंद होते. त्यामुळे चालू आठवड्यात बाजारात हरभरा आवक वाढेल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. तर शेतकऱ्यानी (Farmer) एकदम आवकेचा दबाव निर्माण करू नये, असे आवाहन जाणकारांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com