नागपुरात सोयाबीन दरात सुधारणा

सोयाबीन
सोयाबीन

नागपूर ः हंगामाच्या सुरवातीला अवघ्या २२०० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटलवर असलेल्या सोयाबीनच्या दरात तेजी अनुभवता येण्यासारखी आहे. बाजारात घटती आवक आणि प्रक्रिया उद्योगाकडून वाढती मागणी त्या पार्श्‍वभूमीवर दर वधारत ते तीन हजार रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. या दरात काही अंशी आणखी सुधारणा होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांद्वारे वर्तविली जात आहे.  या वर्षी सोयाबीनलादेखील कमी पावसाचा फटका बसला. मात्र त्यानंतरही सुरवातीला सोयाबीन एकाचवेळी बाजारात मोठ्या प्रमाणावर पोचल्याने दर अवघे २२०० ते २४०० रुपये क्‍विंटलचे होते. आता बाजारातील आवक ३ जानेवारीला ८८९ क्‍विंटल होती तर दर २९४१ रुपये क्‍विंटल मिळाले. ५ जानेवारीला १३५६ क्‍विंटलची आवक आणि दर २९७२ रुपये क्‍विंटलचा दर होता. ६ जानेवारीला दरात चांगलीच सुधारणा होत ३११० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. या दिवशी आवक २०३२ क्‍विंटलची झाली. प्रक्रिया उद्योगाकडून मागणी वाढती असल्याने हे घडल्याचे व्यापारी सांगतात.  बाजारात संत्र्याचीदेखील आवक होत आहे. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना नेहमीप्रमाणे मागणी असल्याचे चित्र आहे. ६ जानेवारी रोजी मोठ्या आकाराच्या संत्र्यांची ७० क्‍विंटल आवक झाली. २८०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल असा संत्र्यांचा दर राहिला. मोसंबीचीदेखील आवक बाजारात होत असून, मोठ्या आकाराची मोसंबीची ११०० क्‍विंटल आवक नोंदविली गेली. १७०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल असा मोसंबीचा दर आहे. त्यात काही अंशी सुधारणा होण्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले. बाजारात ज्वारीची आवक तीन ते सात क्‍विंटल अशी जेमतेम असून, १५०० ते २००० रुपये क्‍विंटलचा दर आहे. सरबती गहू बाजारात २१० क्‍विंटल आला. २२०० ते २७०० रुपये गव्हाचे प्रतिक्‍विंटल दर असून, त्यात सुधारणा होण्याची शक्‍यता नसल्याचे व्यापारी सांगतात.  तांदळाचे दर ५००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचे असून, आवक १५० क्‍विंटलची आहे. तुरीची आवक १०० ते १४५ क्‍विंटल अशी या आठवड्यात होती. तुरीचे दर ३५०० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलचे असून, त्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. मुगाची १५ ते २० क्‍विंटलची आवक या आठवड्यात झाली. ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्‍विंटलचे दर मिळाले. यात काही प्रमाणात वाढ होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com